Home /News /maharashtra /

''पोलिसांनी हिरोईन नाही तर...''मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी NCB वर साधला निशाणा

''पोलिसांनी हिरोईन नाही तर...''मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी NCB वर साधला निशाणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) निशाणा साधला.

    मुंबई, 23 ऑक्टोबर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र अंमली पदार्थांचे केंद्र बनत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर एनसीबी सतत ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई करत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला, एनसीबीनं क्रूझवर (NCB raided) छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला. ज्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेकांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या तस्करीची लाट असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. जसं की जगभरातील ड्रग्स महाराष्ट्रात तयार केली जात असल्यानं आणि केवळ एक विशेष टीमच या रॅकेटला उधळून लावू शकते. पण हे खरे नाही आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनसीबीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. यापूर्वी राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही एनसीबीवर आरोप केले आहेत. हेही वाचा-  लेहेंग्यात लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते 3 किलो ड्रग्ज, NCB नं केली कारवाई टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ठाकरे म्हणाले की, ड्रग्जचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा मला अभिमान वाटतो. तसंच पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी 25 कोटी किंमतीची हेरॉईन जप्त केलं होतं. पण त्यात एकही हिरोईन सहभागी नव्हती. त्यामुळे त्यावर कोणीच काही बोलले नाही. त्या पोलिसांची नावे कोणालाच माहीत नाहीत. आपण त्यांचा आदर केला पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एनसीबीवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस एक मजबूत आणि सक्षम दल आहे आणि ज्यांनी ज्यांनी कायदा मोडला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आम्हाला हे थांबवायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- नाशिक हादरलं,  काडीपेटी पेटवताच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट दरम्यान डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याचा अंतिम मसुदा राज्य सरकार मांडण्याची शक्यता असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, यामध्ये महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेविषयी सांगण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: NCB, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या