उदय जाधव, प्रतिनिधी रायगड, 20 जुलै : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी इथे रात्री उशिरा दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 मृतदेह हाती लागले आहेत, तर ६० जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी तिथल्या महिलेनं सांगितलं 6 जण अडकले आहेत. कसं शोधायचं, काहीच समजत नाही. तिथल्या तरुणानंही सांगितलं आमचे 6 जण आहेत कुठे शोधायचं, त्यावर मुख्यमंत्र्यांनी धीर देत काळजी करु नका तुमच्यासोबत एक माणूस पाठवतो असं सांगितलं आहे. त्यांनी कुटुंबाचं सांत्वन करत धीर दिला आहे.
…तर वाचू शकलं असतं अख्खं गाव? एक दिवस आधीच मिळाली होती दरड कोसळण्याची सूचनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात घटनास्थळावर पोहोचून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्या. ग्रामस्थांशी संवाद साधला आणि तिथल्या कुटुंबांना धीरही दिला आहे. त्याचा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबाला धीर देताना दिसत आहेत.
इर्शाळवाडीमध्ये रात्री दरड कोसळली आणि अख्खं गाव जमीनदोस्त झाली. काही लोक सुदैवानं वाचले तर जवळपास 16-17 घरं दरड कोसळून जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना धीर दिला. #CM #eknathShinde #News18Lokmat pic.twitter.com/4I6SF4uSKN
— News18Lokmat (@News18lokmat) July 20, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरडग्रस्त इर्शाळगड गावाला भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
रात्रीच्या अंधारात मोठा आवाज झाला, पाहिलं तर सगळं गाव नाहीसं झालेलं, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरारतसेच मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्याना धीर दिला. त्याना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून त्याना आशवस्त केले. तसेच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
इर्शाळगडावर दरड कोसळली; दम लागल्याने बचावासाठी गेलेल्या जवानाचा मृत्यूरायगडमध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्यादरम्यान इर्शाळवाडी इथे दरड कोसळली. आधीच पावसामुळे तिथे लाईट गेली होती. त्यात रात्रीच्या अंधारात दरड कोसळली आणि अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. होत्याचं नव्हतं झालं आता NDRF कडून बचावकार्य सुरू आहे.