जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात मोठा आवाज झाला, पाहिलं तर सगळं गाव नाहीसं झालेलं, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार

Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात मोठा आवाज झाला, पाहिलं तर सगळं गाव नाहीसं झालेलं, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार

इर्शाळगडावर दरड कोसळली

इर्शाळगडावर दरड कोसळली

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगड या वाडीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या तरुणांनी या थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दलचा अनुभव सांगितला आहे.

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

रायगड 20 जुलै : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगड या गावात मोठी दुर्घटना घडली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली असून ढिगाऱ्याखाली अडकून काहींचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. तर अनेकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या तरुणांनी या थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दलचा अनुभव सांगितला आहे. या घटनेमधून बचावलेले तरपण गे रात्री शाळेत झोपण्यासाठी गेले होते. त्यामुळे सुदैवाने यात ते बचावले आहेत. मात्र त्यांचे कुटुंबीय अजूनही बेपत्ताच आहेत. मलब्याखाली अनेक कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेतून बचावलेल्या तरुणांनी सांगितलं, की ते सहाजण रात्री साडेदहा ते 11 च्या दरम्यान झोपण्यासाठी शाळेमध्ये गेले होते. काहीच वेळाने रात्री अंधारात मोठा आवाज झाला. दरड कोसळल्याचा आवाज येताच तरुण धावत डोंगराच्या पायथ्याशी आले. मात्र तोपर्यंत हे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर दरड कोसळली; दम लागल्याने बचावासाठी गेलेल्या जवानाचा मृत्यू या तरुणांचे कुटुंबीयही या घटनेत बेपत्ता झाले आहेत. ते या मलब्याखाली अडकले आहेत. ते आपल्या कुटुंबीयांच्या सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहात आहेत. सुदैवाने ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत. मात्र घरातील इतर सदस्यांच्या काळजीत ते मोठा आक्रोश करत रेस्क्यू टीमकडे मदत मागत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरडग्रस्त इर्शाळगड गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या घटनेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्यांना धीर दिला. त्यांना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल, असं सांगितलं. तसंच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावं यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात