मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र तिथे पोहचणं प्रचंड अवघड आहे. त्यामुळे सगळ्यांना खाली थांबवून ठेवलं आहे एकच व्यक्ती दोरीला पकडून या वाटेने जाऊ शकतो कारण बाजूला दरी आहे अशात घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे उंचीवर जाताच हा जवान घाबरला होता ज्या उंचीवर ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या उंचीवर पोहोचणं हे अनेकांना शक्य नाही त्यामुळे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून काही नागरिकांना बाहेर काढले जाऊ शकतं.