Irshalgad Landslide : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळली. यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. तर 60 पेक्षा अधिक लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहे. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र आजच्या या घटनेचा इशारा कालच एका संस्थेने दिला होता. गांभिर्याने या इशाऱ्याची दखल घेतली असतील तर अख्ख गावं वाचवता आला असतं का? असा सवाल आता उपस्थित होतोय. Irshalgad Landslide : इर्सालवाडीवर दरड कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, पहा घटनास्थळाचे थरकाप उडवणारे photos पुण्यातील एका संस्थेद्वारे दरडी कोसळण्याच्या घटनांची किमान 24 ते 47 तास आधी पूर्वकल्पना दिली जाते. हा इशारा ‘सतर्क’ या यंत्रणेकडून दिला जातो. पुण्यातील ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’ (सीसीएस) ने ही यंत्रणा विकसित केली आहे. मागच्या पडलेल्या पावसाची लेटेस्ट माहिती. तसंच पुढच्या किमान 6 दिवसांचा पावसाचा अंदाज आणि दरडप्रवण भागांमधील नागरिकांकडून मिळणारी माहिती या आधारे ‘सतर्क’ संस्था ही राज्यातील नागरिक, शासन आणि प्रशासनाला दरडी बाबत सतर्क करत असते. फेसबुक, ट्विटरवरून याविषयीच्या डिटेल्स दिल्या जातात.आता देखील 19 जुलै रोजी या संस्थेनं रायगडसह अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केल्या होत्या. सतर्क संस्थेकडून देण्यात आलेला इशारा हा गांभिर्याने घेतला असता तर आज अनेक जीव वाचले असते. Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर दरड कोसळली; दम लागल्याने बचावासाठी गेलेल्या जवानाचा मृत्यू सतर्क संस्थेने काय म्हटलं होतं? सतर्क संस्थेने 19 जुलै 23 पुढील 47 तासात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. यामध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यांची नावं होतं. या ठिकाणी डोंगरावरुन दगड, माती घसरुण येणे, झाले, झाडं, भिंती पडणे, जुन्या इमारती, वाडे किंवा त्यांचे भाग कोसळणे, जमीन, रस्ते खचणे, फ्लॅश फ्लड, पाणी साचणे, वाहतूककोंडी अशा घटना घडू शकतात. इर्शाळवाडीविषयी सतर्क संस्थेने काय म्हटलं होतं?
दरड प्रवण क्षेत्रांमध्ये या भागांची आहेत नावं माळशेज, माथेरान, लोणावळा, खंडाळा, कार्ले, रायगड, कल्याण, भिवंडी, मुंबई, भांडुप, विक्रोळी, ताम्हिणी, वरंध, दापोली, खेड, चिवळून, कुंभार्ली, आंबेनळी, पोलादपूर, महाबळेश्वर, पसरणी, केळघर, कशेडी, परशुराम, भोस्ते, भुईबावडा, गगनबावडा, आंबा. यासोबतच मुंबई-पुणे लोहमार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वे, सिंहगड, माथेरान, महाबळेश्वर, यासोबतच पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या घाट क्षेत्रातील पर्यटन स्थळ, गड, किल्ल्यांवर विशेष खरबदारी घेण्याचा इशारा सतर्क संघटनेकडून देण्यात आला आहे.