मुंबई, 25 मार्च : 'ज्या काँग्रेसने सावरकर यांचा अपमान केला, मोदी यांचा चोर म्हणून उल्लेख केला. त्यांच्यासोबत ही लोक फिरत आहे. मागच्या निवडणुकीमध्ये चौकीदार चोर आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर ज्या प्रकारे मनिशंकर यांना जोडे मारले होते, त्यानुसार यांना जोडे मारले असते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप आज वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या मुद्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला.
'सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहुल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आज ही ते म्हणाले की, माफी मागायाला मी सावरकर आहे का? त्यांना याची शिक्षा पाहिजे, त्यांच्यासोबत ही लोक फिरत आहे. ज्या काँग्रेसने सावरकर यांचा अपमान केला, मोदी यांचा चोर म्हणून उल्लेख केला. मागच्या निवडणुकीमध्ये चौकीदार चोर आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर ज्या प्रकारे मनिशंकर यांना जोडे मारले होते, त्यानुसार यांना जोडे मारले असते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर केली.
अजितदादांचा नवीन गूण पाहण्यास मिळाला, त्यांचा डोळा मारण्याचा गूण पाहण्यास मिळाला आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी अजितदादांना लगावला.
राज्याच्या राजकारणात कुणीही शत्रू नाही - फडणवीस
'विरोधी पक्षनेते असतात त्यांच्या दोन पर्याय असतात. सभागृहात गोंधळ घालायचा आणि काम बंद पाडायचं. दुसरं असं की, चर्चा करायची आणि सरकारकडून उत्तर घ्यायचं. कुठल्या ही विरोधी पक्षाने गोंधळ घालायचं असतं. तेच त्यांनी तिथे केलं आहे. सभागृह नीट चाललं आहे. याची बातमी केली पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लागला.
अतिशय गांभीर्याने गोष्ट सांगतोय, महाराष्ट्राची परंपरा आहे, इथं कुणीही शत्रू नाही, असं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Rahul gandhi, Shivsena