मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात राडा, हाणामारीत केला अ‍ॅसिड हल्ला, 6 होरपळले

मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात राडा, हाणामारीत केला अ‍ॅसिड हल्ला, 6 होरपळले

लहान मुलं खेळत असताना त्यांच्यात वाद झाला आणि घडलं भयंकर....

  • Share this:

कल्याण, 5 नोव्हेंबर: कल्याणमध्ये मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. अ‍ॅसिड हल्ल्यात 6 जण गंभीररित्या होरपळले आहेत. कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात ही घटना घटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये एका घरावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी लहान मुलं खेळत असताना त्यांच्यात वाद झाला. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा...यंदाची दिवाळी फटाक्याविना? मुंबईकरांसाठी BMC लवकरच घेणार मोठा निर्णय

मात्र, गुरुवारी या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत हल्ला करताना एका गटाकडून अ‍ॅसिडचा वापर करण्यात आला. या अ‍ॅसिड हल्ल्यात मेहजबीन अन्सारी, ललिता विश्वकर्मा, टिंकू मंडल, रेणू मंडल आणि तब्बसूम अन्सारी आणि एक इतर महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. सर्व जखमींवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेहजबीन अन्सारी व ललिता विश्वकर्मा या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मात्र, यापैकी नेमकं अ‍ॅसिड कोणी कोणावर फेकले याचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसही संभ्रमात आहेत. त्याचा छडा लावण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे एकच खळबळ उडली आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. ॲसिड कोणी आणि कशासाठी आणला होता, याबाबतही पोलीस कसून चौकशी करत आहेत. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत. तर कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली आहे.

मारहाणीत चोरट्याचा मृत्यू...

भिवंडी शहर परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरी करण्याच्या हेतूनं आलेल्या चोरट्याला पकडून त्याला केलेल्या मारहाणीमध्ये चोरट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बालाजी नगर परिसरात घडली.

या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अजय वर्मा (वय-29), अश्रफ खान (वय-24) आणि सुरज वर्मा (वय-27) अशी आरोपींची नावं आहेत. तर समसुद्दिन मोहम्मद शेख ( वय-26, रा लाहोटी कंपाउंड) असं मृत चोरट्याचं नाव आहे. मृत तरुणाच्या विरोधात चोरी व घरफोडीसारखे चार गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

शहरातील नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजीनगर परिसरामध्ये असलेल्या एका खानावळमध्ये बुधवारी पहाटे चोरीच्या हेतूनं गेला असता खानावळमध्ये झोपलेल्या कामगारांनी चोराला बाहेर निघत असताना पाहिले व आरडाओरडा करून कामगारांना तसेच मालकाला उठवून चोराला पकडलं. त्याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा..इनकमिंग सुरूच! एकनाथ खडसेंसह 5 माजी आमदारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

समसुद्दिन शेख यास वर्मी मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. नंतर मारहाण करणाऱ्या आरोपींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर मारहाण झालेल्या समसुद्दीन यास तात्काळ भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी खानावळ मालक व त्याच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 5, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या