मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नवरा-बायकोच्या भांडणात निर्दयी आईनं 8 महिन्यांच्या चिमुरडीला फेकलं विहिरीत

नवरा-बायकोच्या भांडणात निर्दयी आईनं 8 महिन्यांच्या चिमुरडीला फेकलं विहिरीत

नवरा-बायकोच्या क्षुल्लक भांडणात निर्दयी आईने आपल्या 8 महिन्यांच्या पोटच्या मुलीला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवरा-बायकोच्या क्षुल्लक भांडणात निर्दयी आईने आपल्या 8 महिन्यांच्या पोटच्या मुलीला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवरा-बायकोच्या क्षुल्लक भांडणात निर्दयी आईने आपल्या 8 महिन्यांच्या पोटच्या मुलीला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुलडाणा, 28 एप्रिल: नवरा-बायकोच्या क्षुल्लक भांडणात निर्दयी आईने आपल्या 8 महिन्यांच्या पोटच्या मुलीला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहकर येथील जाणेफळ रोडवरील नवीन घरकुल परिसरात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून चिमुकलीचा शोध सुरू आहे. सदर विहिर 40 फूट खोल असून त्यात खूप पाणी आहे. तसेच अंधार पडल्यामुळे शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे चिमुरडी जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा..भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी हत्याकांड, बापानेच 2 मुलांना घातल्या गोळ्या

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर परिषदच्या वतीने जानेफळ रस्त्यावर बांधण्यात आलेल्या घरकुल येथे राहणाऱ्या सलीम चौधरी गवळी व त्याची पत्नी जरीना सलीम चौधरी या दोघांमध्ये कायम वाद होत होते. मंगळवारीही दोघांचे क्षुल्लक कारणावरुन भांडण झालं. रागाच्या भरात जरीना हिने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिले. या घटनेमुळे घरकुल परिसरात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा.. आणखी 2 साधूंची हत्या, भाजपमध्ये 'इतना सन्नाटा क्यों है भाई?', काँग्रेसचा सवाल

चिमुरडीला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. परिसरातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. विहिरित जास्त पाणी असल्याने चिमुरडीचा अद्याप शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दुसरीकडे, बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. ज्येष्ठ भाजप नेत्याच्या घरी ही गोळीबाराची घटना घडली आहे. या नेत्याच्या भावाने स्वतःच्या 2 मुलांना घरगुती भांडणानंतर रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मुलांवर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव मूलचंद द्विवेदी आहे. या गोळीबारानंतर रुग्णालयात नेताना एका मुलाचं निधन झालं  तर दुसरा मुलगा अत्यवस्थ आहे. चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपुरात  हलवण्यात आलं आहे. गोळीबार आणि आत्महत्येचे नेमके कारण मात्र अज्ञात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

संपादन-संदीप पारोळेकर

First published:
top videos