पुणे, 20 मे : येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी नांदायला आली नाही म्हणून एक तरुण थेट विजेच्या टॉवरवरच (Youth Climbed on Tower) चढला. तसेच त्याने यावेळी एक टोकाची भूमिकाही घेतली. केशव काळे असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय 23 आहे. पत्नी (Wife) माझ्यासोबत येणार नसेल तर मी आत्महत्या करतो, असाच निर्णय त्याने घेतला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला पत्नीशी बोलणं करुन देतो, असा विश्वास दिला. यानंतर त्याने टॉवरवरुन खाली येण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं? केशव हा मूळ अहमहनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथील रहिवासी आहे. तर त्याची पत्नी पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. यानंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी कुटुंबाची सहमती मिळवून चार महिन्यापूर्वी दोन्ही लग्नबंधनात अडकले. यानंतर कामानिमित्ताने दोघेही पुण्याच्या चाकण येथे राहायला लागले होते. रागाच्या भरात चढला टॉवरवर आणि केशव दारू प्यायचा. त्याच्या या सवयीमुळे दोघांचे नेहमी भांडण व्हायचे. या भांडणाचे रुपांतर असे झाले की, एक एप्रिलला केशवने त्याच्या पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे बंद होते. मात्र, 19 मेला गुरुवारी केशव कुटुंबीयांना घेऊन पत्नीच्या घरी गेला. यावेळी तिला सर्वांनी घरी परत येण्याबाबत विनवणी केली. मात्र, नांदायला येणार नाही, असा हट्ट तिने कायम ठेवला. याला केशवला प्रचंड राग आला. या रागाच्या भरातच तो गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हाय टेन्शन टॉवरवर चढला. तसेच पत्नी सोबत आली नाही, तर मी जीव देईल, अशी टोकाची भूमिका त्याने यावेळी घेतली. हेही वाचा - रात्री फोन करुन म्हणाला दारू पी आणि…; वैद्यकीय अधिकाऱ्याने केला सहकारी डॉक्टरचा विनयभंग
यावेळी त्याचे कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. त्यांनी लगेचच घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तरीसुद्धा केशव पोलिसांचे ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वास दिला. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिला नांदायला पाठवतो, असे पोलिसांनी केशवला सांगितल्यावर तासाभरानंतर तो टॉवरवरुन खाली उतरला. मात्र, इतके करुनही विशेष म्हणजे शेवटी त्याच्या पत्नीचे मतपरिवर्तन झाले नाही.