जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रात्री फोन करुन म्हणाला दारू पी आणि...; वैद्यकीय अधिकाऱ्याने केला सहकारी डॉक्टरचा विनयभंग

रात्री फोन करुन म्हणाला दारू पी आणि...; वैद्यकीय अधिकाऱ्याने केला सहकारी डॉक्टरचा विनयभंग

रात्री फोन करुन म्हणाला दारू पी आणि...; वैद्यकीय अधिकाऱ्याने केला सहकारी डॉक्टरचा विनयभंग

एका डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग (Molestation of Woman Doctor) केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 20 मे : एका डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग (Molestation of Woman Doctor) केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 2 जून 2021 रोजी घडली होती. जितेंद्र वानखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. न्यायाधीश डी. एन चामले यांनी गुरुवारी या प्रकरणाचा निकाल दिला. रात्री साडेबारा डॉक्टर आला अन्… पहूर ग्रामीण रुग्णालयात (Pahur Civil Hospital) वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जितेंद्र वानखेडे हा कार्यरत होता. त्याने 2 जून 2021 रोजी आपल्याच सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केला. (Medical Officer Molest his colleague) याप्रकरणी पीडितेने तक्रार दिली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, 2 जून 2021 रोजी पीडित महिला ही ड्युटीवर होती. याचवेळी रात्री सुमारे साडेबारा वाजता डॉ. वानखेडे हा तिथे आला. यावेळी त्याने त्याच्या बायकोचा वाढदिवस असल्याने काही पदार्थ खाण्यासाठी आग्रह केला. आरोपी हा दारुच्या दशेत होता. म्हणून पीडितेने पार्सल घेतले आणि दार बंद केले. महिला डॉक्टरला दारू प्यायला सांगू लागला…  यानंतर आरोपीने पुन्हा या महिला डॉक्टरला रात्री 1 वाजेच्या सुमारास फोन केला. आणि तिला व्हॉट्सअॅपवर यायला सांगितले. आरोपी हा रात्रभर तिला दारू प्यायला सांगत होता. या संपूर्ण प्रकारला ती कंटाळली. यानंतर तिने पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिला. या तक्रारीनंतर आरोपी डॉ. जितेंद्र वानखेडेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. हेही वाचा -  पत्नीला ‘त्या’ अवस्थेत पाहून पतीला बसला धक्का; गळफास घेऊन संपवलं जीवन

न्यायालयाने त्याला आता वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश डी. एन चामले यांनी गुरुवारी या प्रकरणाचा निकाल दिला. 2 जून 2021 रोजी घडलेल्या या घटनेच्या तपासादरम्यान, सहा साक्षीदार तपासण्यात आले. तर सरकारी पक्षाकडून अॅड. कृतिका भट यांनी बाजू मांडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात