मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा 'नटी' म्हणून उल्लेख

गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा 'नटी' म्हणून उल्लेख

मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार

मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार

शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 5 नोव्हेंबर : शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी चुकीचा उल्लेख केला आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या भागात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर दोघांमध्येही कलगीतुरा सुरूच आहे. दरम्यान टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील..

ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

'मी आदित्य ठाकरेंना गाढव म्हणणार नाही पण आम्ही काय गाढव होतो का?'

आदित्य ठाकरे यांनी आज कबुली दिली आहे की शिवसेनेत फूट पडण्यामागे मी स्वतः जबाबदार आहे, यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मूळ चुका या त्यांच्याच होत्या. मात्र तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. आम्ही गद्दार नव्हतोच. आम्हाला यांनी समजूनच घेतलं नाही. राज्यात आज फिरताहेत, आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात, आणि बाळासाहेबांचे नातू आहात. त्यामुळे फिरल्यामुळे, काही ना काही नाराजी या दूर होतील.

पदयात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा; भारत जोडायचा असेल तर.. प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला

समस्या दूर होतील असे वाटले होते. पण गाढवांच्या पुढे वाचली गाथा आता रात्रीचा गोंधळ बराच होता असे म्हणत एखाद्या माणसाने सांगावं आणि इतरांनी ते ऐकूच नये. याबद्दल मी आदित्य ठाकरे यांना गाढव म्हणणार नाही. त्यांनी आमच्या समोर वाचलं पण आम्ही गाढव होतो का काय. त्यांनी आता कबुली दिली मात्र वेळ निघून गेली आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे लगावला.

First published:

Tags: Gulabrao patil, Sushma