मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : पुण्यात लवकरच भाड्यानं मिळणार इ-बाईक; पालिकाच राबवणार प्रोजेक्ट, VIDEO

Pune : पुण्यात लवकरच भाड्यानं मिळणार इ-बाईक; पालिकाच राबवणार प्रोजेक्ट, VIDEO

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पुण्यातील प्रकल्प आणि ईव्ही-चार्जिंग स्टेशनच्या उभारणीसाठी मान्यता दिली आहे.

    पुणे, 22 सप्टेंबर : पुणे शहरात वाहतूककोंडी आणि पर्यावरणाची समस्या नेहमीच निदर्शनास येते. हीच समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पुण्यातील प्रकल्प आणि ईव्ही-चार्जिंग स्टेशनच्या उभारणीसाठी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे शहरात इलेक्ट्रिक बाईक लवकरच भाड्याने मिळणार आहे. स्थायी समितीने के-फेसिंग पॉईंट्सच्या सहकार्याने इ-बाईक भाड्याने घेतलेल्या प्रकल्पासाठी पुणे शहरात 250 वेगवेगळ्या ठिकाणी 1500 स्वॅपिंग पॉईंट्स असणार आहेत. आणखी 1000 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स आणि 1500 स्वॅपिंग पॉईंट्स लवकरच उपलब्ध होणार आहेत. याबाबत पुणे महानगरपालिका पथ विभाग मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल वाहनांचा वापर कमी करण्यासाठी, हानिकारक वायू सोडणे आणि पर्यावरण प्रदूषित करणे पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर  सेवा इ-बाईक सुरू करण्यात येणार आहे. प्रथम टप्पात 250 ठिकाणी हा प्रकल्प दोन महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. व्हिट्रो कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार आहे. हेही वाचा : एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही 'या' चूका, नाहीतर Offer पडेल महागात आम्ही बाईकसह वेगवान चार्जर्सचे पॉईंट्स तयार करीत आहोत. आपल्या निवडीनुसार एक दिवसीय, मासिक आणि साप्ताहिक वापरासाठी अॅप सक्षम असेल. सुरुवातीला 250 चार्जिंग पॉईंट्स सुरू करणार आहे. तसेच 48 महिन्यांच्या आत भारतात भविष्यातील कमाल इ-बाईक वापरून पुणेकर हरित क्रांतीमध्ये जादू तयार करतील असे व्हिट्रोचे डॉ. हेरंब शेळके यांनी सांगितले आहे. पुणे महानगरपालिकेकडून निविदा जाहीर  हा प्रकल्प संपूर्ण भारतातील पहिली महानगरपालिका पुणे महानगरपालिका आहे जो हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पाद्वारे पुणे महानगरपालिकेने निविदा काढून सदर प्रकल्प दिले आहेत. या प्रकल्पाद्वारे ठेकेदारांनी स्वतःच्या जागेमध्ये चार्जिंग स्टेशन आणि स्वतः मेहकर उपलब्ध करून द्यायचे आहेत तसेच या वेहिकल्सची संपूर्ण सुरक्षितता आणि सर्व जबाबदारी ही ठेकेदारांची असणार आहे. यामध्ये 25 किलोमीटर पेक्षा कमी वेगाची बाईक वापरायला लायसनची आवश्यकता भासणार नाही. मात्र त्याच्या पुढील वेगाशी 60 किलोमीटरच्या वेगाची बाईक वापरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे.  हेही वाचा : Windows 11 साठी मायक्रोसॉफ्टचं नवीन अपडेट; युझर्सना मिळणार खास फीचर्स इ-बाईक वापरण्यासाठी एवढा येईल खर्च  इ-बाईक वापरण्यासाठी सरासरी कमीतकमी 90 पैसे पासून ते जास्तीत जास्त 4 रु. किमी याप्रमाणे खर्च पुणेकरांना येणार आहे.
    First published:

    Tags: Pune, Pune Muncipal corporation

    पुढील बातम्या