मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Windows 11 साठी मायक्रोसॉफ्टचं नवीन अपडेट; युझर्सना मिळणार खास फीचर्स

Windows 11 साठी मायक्रोसॉफ्टचं नवीन अपडेट; युझर्सना मिळणार खास फीचर्स

Windows 11 2022 Updates

Windows 11 2022 Updates

युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सातत्यानं विंडोजमध्ये वेगवेगळे अपडेट आणत असते. मायक्रोसॉफ्टने नुकतेच विंडोज 11च्या (Windows 11) पुढच्या व्हर्जनचे अपडेट (Update) रोलआउट केले आहेत.

मुंबई, 22 सप्टेंबर : लॅपटॉप, डेस्कटॉप ही आता रोजच्या वापरातली उपकरणं झाली आहेत. आता बहुतांश कामं ऑनलाइन (Online) होत असल्याने साहजिकच या दोन्हींचं महत्त्व वाढलं आहे. लॅपटॉप, डेस्कटॉपवर आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम (Windows Operating System) वापरतो. युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सातत्यानं विंडोजमध्ये वेगवेगळे अपडेट आणत असते. मायक्रोसॉफ्टने नुकतेच विंडोज 11च्या (Windows 11) पुढच्या व्हर्जनचे अपडेट (Update) रोलआउट केले आहेत. या नव्या व्हर्जनमध्ये युझर्सना आणखी नव्या सुविधा मिळणार आहेत. मायक्रोसॉफ्टने एका ब्लॉगमधून या नव्या अपडेटविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच युझर्सची या नव्या अपडेटबाबत उत्सुकता वाढली आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 11चे अपडेट रोलआउट केले आहेत. भारतासह जगभरात 190 पेक्षा अधिक देशांमध्ये हे नवे अपडेट रोलआउट करण्यात येत आहेत. नव्या व्हर्जनमध्ये युझर्सना फाइल एक्सप्लोरर विंडोत टॅब (Tab) आणि स्टार्ट मेन्यू (Start Menu) मिळेल. या अपडेटमध्ये सिस्टीम वाइड लाइव्ह कॅप्शन, पीसी व्हॉइस कंट्रोल आणि स्मार्ट अ‍ॅप कंट्रोलही दिला जाणार आहे. विंडोज 11 - 2022 व्हर्जन स्टार्ट मेन्यूमध्ये अपडेट आणलं आहे. या अपडेटनंतर युझर्सना फाइल एक्सप्लोररमधली विजेट्स, बोर्ड आणि टॅबमध्ये जलद आणि अधिक अचूक शोध, चालू घडामोडींचं कव्हरेज, उत्तम लोकेशन, तत्पर सेटिंग्ज आदी गोष्टी उपलब्ध होतील. कोणत्याही प्रकारच्या ऑडिओ सामग्रीमधून ऑटोमॅटिक कॅप्शन जनरेट करण्यासाठी यात सिस्टीम वाइड लाइव्ह कॅप्शन (System Wide Live Caption) सुविधा देण्यात आली आहे. यामुळे व्हॉइस अ‍ॅक्सेसदेखील मिळेल. या फीचरच्या मदतीनं युझर्स त्यांचा आवाज वापरून पीसी आणि लेखक टेक्स्ट यांना नियंत्रित करू शकतो. नॅरेटर फीचरसाठी एक नैसर्गिक आवाजदेखील यात आहे. तो नैसर्गिक भाषण अधिक बारकाईने टिपतो. वेब वाचण्यासाठी, तसंच ब्राउज करण्यात मदत करण्यासाठी अधिक आनंदादायी ऑडिओ तयार करतो. अपडेटमध्ये उत्तम टच नेव्हिगेशन आणि मायक्रोसॉफ्ट एजमध्ये अनेक ब्राउजर टॅब स्नॅप करण्याच्या क्षमतेसह वैविध्यपूर्ण स्नॅप लेआउट देण्यात आला आहे. युझर्सचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मायक्रोसॉफ्ट फोकस सेशन्स आणि `डू नॉट डिस्टर्ब`देखील लॉंच करत आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स, नवीन क्रिएटर टूल्स, अतिरिक्त गेमिंग सुविधा आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअरच्या अनुभवासाठी अपडेट अधिक चांगला असावा याकरिता त्यात विंडोज साउंड इफेक्ट 4 (Windows Sound Effect 4) हे नवं फीचरदेखील देण्यात आलं आहे. विंडोज 11 - 2022 अपडेटमध्ये समाविष्ट असलेलं आणखी एक फीचर म्हणजे स्मार्ट अ‍ॅप कंट्रोल (Smart App Control) होय. हे अ‍ॅप विंडोज 11 वर अविश्वासू, असुरक्षित अ‍ॅप्लिकेशन्स, स्क्रिप्ट फाइल्स आणि मॅलिशियस मॅक्रोजचा वापर करण्यापासून रोखतं. विंडोज डिफेंडर अ‍ॅप्लिकेशन कंट्रोलमध्ये वापरल्या जाणाऱ्या एआयवर हे तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. हे तुमच्या डिव्हाइसवर एखादं अ‍ॅप्लिकेशन सुरू होण्यापूर्वी त्याच्या सुरक्षेचा अंदाज लावू शकतं. विंडोज 11 असलेले लॅपटॉप किंवा डेस्कटॉप युझर्स विंडोज अपडेट सेटिंग्ज स्क्रीनवर जाऊन त्यांचं डिव्हाइस अपडेट करू शकतात. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्यात. अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जावं. त्यानंतर 'विंडोज अपडेट'वर जावं. तिथं 'चेक फॉर अपडेट्स'वर क्लिक करावं. तुमच्या डिव्हाइसवर अपडेट उपलब्ध असतील तर तुम्ही डाउनलोड हा ऑप्शन निवडू शकता. त्याचप्रमाणे गरजेनुसार अपडेट रोखू शकता किंवा अपडेटची वेळ बदलू शकता.
First published:

पुढील बातम्या