मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्याचे दोन भाग होणार? चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!

पुण्याचे दोन भाग होणार? चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 2 सप्टेंबर : काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. काहींनी तर काँग्रेसचे काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट तर केलीच, शिवाय पुण्याचे दोन भाग होण्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.

पुणे महापालिकेचे किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे, असं चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते. यानंतर पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुणे महापालिकेचे भविष्यात दोन भाग होऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी गोवा राज्याचं उदाहरण दिलं होतं.

पुण्याचे दोन भाग होण्याबाबत फडणवीस म्हणाले...

पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता आहे जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू कशाला काढता आहे जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचं आहे. माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही. गणपतीच्या एका ठिकाणी मी पोहोचलो, तेव्हाच तेदेखील पोहोचले. मात्र त्यांची आणि माझी कुठेही भेट झालेली नाही.

पुणे महापालिकेचं विभाजन होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही, पुण्याची लोकसभा ही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का? असंही ते यावेळी म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं ते म्हणाले. काँग्रेसच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी मौन बाळगले.

First published:

Tags: Chandrakant patil, Devendra Fadnavis, Mumbai, Pune