जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : 'चलो अयोध्या' राज ठाकरेंनी तारखेसह केली मोठी घोषणा

BREAKING : 'चलो अयोध्या' राज ठाकरेंनी तारखेसह केली मोठी घोषणा

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे हे कामाला लागले आहे.

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे हे कामाला लागले आहे.

‘देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा

  • -MIN READ
  • Last Updated :

**पुणे, 17 एप्रिल : ‘**देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल’ असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी पुन्हा एकदा दिला. तसंच, 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला (ayodhya) जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद (raj thackeray press conference) घेऊन पुन्हा एकदा भोंग्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आम्हाला कुठली ही दंगल नको.  देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, भोंग्याचा मुस्लीमांना सुद्धा त्रास होतोय. देशभरातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे हा भोंग्याचा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, असं राज ठाकरे म्हणाले. ( नेश कार्तिक टीम इंडियाकडून पुन्हा खेळणार? वाचा, काय दिलं विराटनं उत्तर ) आमची सर्व तयारी सुरू आहे आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे.  प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना loud स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावर लाऊ, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. ( हनुमान चालिसा प्रकरणावरुन वादंग; शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिला हा इशारा ) १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. आणि ५ जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात