मुंबई, 17 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 202) दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) एक नवं रूप पाहयला मिळतंय. कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरंनं (RCB) फिनिशरची भूमिका दिली आहे. तो ती भूमिका चोख पार पडतोय. आरसीबीच्या आत्तापर्यंतच्या चारही विजयात कार्तिकचा महत्त्वाचा वाटा आहे. 6 मॅचच्या 6 इनिंगमध्ये कार्तिकने 192 ची सरासरी आणि 208.69 च्या स्ट्राईक रेटने 192 रन केले आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. 6 इनिंगमध्ये कार्तिक 5 वेळा नाबाद राहिला आहे. कार्तिकचा हा खेळ पाहून त्याला टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीवरील विजयानंतर बोलताना कार्तिकनंही आपलं मुख्य लक्ष्य हे टीम इंडियात खेळणे हेच असल्याचं जाहीर केलं आहे. मी मोठं लक्ष्य निश्चित केलं आहे. ते साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. देशासाठी काही तरी मोठं करण्याचं माझं लक्ष्य आहे. हे सर्व त्या प्रवासाचा भाग आहे. मला टीम इंडियात पुन्हा जागा मिळवायची आहे. त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावण्यास तयार आहे.’ अशी प्रतिक्रिया कार्तिकनं दिल्लीवरील विजयानंतर दिली. आरसीबीच्या विजयानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) दिनेश कार्तिकची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्येही कार्तिकनं ‘मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणे आणि तो भारतासाठी जिंकणे हे माझं लक्ष्य आहे,’ असं पुन्हा एकदा सांगितलं. IPL 2022 : मुंबई इंडियन्स कमबॅक करणार! राजस्थानच्या कोचनं व्यक्त केला विश्वास या मुलाखतीच्या शेवटी विराटन कार्तिकच्या खेळावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘दिनेश कार्तिकनं आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळण्यासाठी भक्कम दावेदारी सादर केली आहे, हे मी नक्की सांगू शकतो. माझ्यासाठी तो या आयपीएलमधील बेस्ट खेळाडू आहे.’ असं विराट म्हणाला. दरम्यान आरसीबीची टीम 6 मॅचमध्ये 4 विजय आणि 2 पराभवासह पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची पुढील लढत मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.