अमरावती, 17 एप्रिल : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या दाम्पत्याने हनुमान चालिसा प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिक करणार आंदोलन - या प्रकरणावरून संतप्त झालेले शिवसैनिक हे राणा यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तसेच त्याठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. राणा यांची मातोश्रीवर जाण्याची हिंमत नाही. त्यांनी आधी अमरावतीच्या शिवसैनिकांना ऐकून घ्यावे, असा इशाराही अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिला आहे. तर या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
नवनीत राणांचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज -
सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा (Hanuman Chalis ) व भोंगा यावरून मोठा वाद सुरू असताना या वादामध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचणार, असा इशाराचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला होता. मात्र, राणा दाम्पत्याच्या या इशाऱ्यानंतर शनिवारी सकाळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांना राणा दाम्पत्याला तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याला आता त्यांनी प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा - शरद पवार-राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद; प्रकरणात लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा?
शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. त्यादिवशी मी ‘मातोश्री’वर येईल आणि हनुमान चालिसाचं पठण करेन, या शब्दात त्यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद माझ्या पाठिशी आहे. याशिवाय, संकटमोचक हनुमानही माझ्या पाठिशी आहे, असेही नवनीत राणा यांनी म्हटले, या शब्दात त्यांनी शिवसैनिकांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणावरून संतप्त झालेले शिवसैनिक हे राणा यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत.