ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले?
1999 ला युती सरकार जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार राज्यात सत्तारूढ झालं. अविनाश भोसले यांनी नव्या सत्ताधाऱ्यांशी देखील तेवढच जुळवून घेतलं आणि त्यांची आर्थिक घोडदौड तशीच पुढे सुरूच राहिली. एकीकडे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्यानंतर देखील वर्षानुवर्ष रखडत होते तर दुसरीकडे अविनाश भोसले यांची संपत्ती डोळे विस्फारणाऱ्या वेगाने वाढत होती. पुण्यातील बाणेर भागात अविनाश भोसले यांनी उभारलेलं व्हाईट हाऊस थोड्याच कालावधीत चर्चेचा विषय बनलं. या व्हाईट हाऊसच्या समोर अविनाश भोसलेंच्या मालकीच तीन हेलिकॉप्टर उभी राहिली. अवघ्या काही वर्षांमध्ये रिक्षा व्यवसाय ते स्वतःच्या मालकीची हेलिकॉप्टर इथपर्यंतचा झालेला अविनाश भोसले यांचा प्रवास अचंबित करणारा होता. पहिल्यांदा अटक अविनाश भोसले यांच्या या वेगवान प्रवासाला ब्रेक लागला तो 2007 साली. जेव्हा मुंबई एअरपोर्टवरती त्यांना कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली. लंडनहून येताना आणलेल्या महागड्या वस्तू आणि परदेशी चलन अविनाश भोसलेंनी कस्टम ड्युटी चुकवुन एअरपोर्टच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचावर आरोप होता. मात्र, पुढे या प्रकरणात फारशी चौकशी झाली नाही आणि सर्वपक्षी आणि त्यांची असलेल्या संबंधांमुळे अविनाश भोसले यांचा प्रवास पुढे सुरू राहिला. हॉटेल व्यवसायात प्रवेश नंतर जलसंपदा विभागातील ठेकेदारी कमी करून बांधकाम क्षेत्र, रस्ते आणि पूल उभारणी, हॉटेल व्यवसाय याकडे मोर्चा वळवला. पुण्यातील कोरेगाव पार्क भागात त्यांनी उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहिले. अविनाश भोसले यांच्या या प्रवासात राजकीय नेत्यांची त्यांची असलेली जवळीक ही अनेकदा दिसून आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा अविनाश भोसले स्वतःची गाडी घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचे सारथ्य करायचे. शिवाय बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला अनेकदा अविनाश भोसले यांच्या बंगल्या मध्ये मुक्कामाला देखील राहिलेत. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टर चा उपयोग केला ते हेलिकॉप्टर देखील अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाहावा विठ्ठल या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभारही मानलेत.भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? देशातल्या राजकीय घडामोडींना वेग
इन्कमटॅक्स विभागाचा छापा 2017 साली इन्कमटॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. यावेळी ईडीने अविनाश भोसले यांना 2007 साली त्यांच्यावरती कस्टम विभागाकडून ज्या फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती, त्या प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी चौकशीला बोलावल्याचा सांगण्यात आलं होतं.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Avinash Bhosale, Pune