जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हम बेवफा हरगीज ना थे, पर..'; सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, 'मला शिंदे गटाची काळजी वाटते'

'हम बेवफा हरगीज ना थे, पर..'; सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, 'मला शिंदे गटाची काळजी वाटते'

Supriya Sule and Eknath Shinde

Supriya Sule and Eknath Shinde

‘मला एक गाणं आठवतं. हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके’ या ओळी म्हणत सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 09 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह घ्यावं लागणार आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया देत हा शिवसेनेवर अन्याय असल्याचं म्हटलं आहे. Shivsena VS Shinde : ‘धनुष्यबाण’ न मिळाल्यामुळे गुलाबराव पाटील दुखावले, म्हणाले… सुप्रिया सुळे म्हणाल्या, की दोन गोष्टी आपण बघू शकतो. हा शिवसेनेवर अन्याय आहे. यावेळी त्यांनी एका गाण्याच्या ओळी म्हणत शिंदेंनाही टोला लगावला. त्या म्हणाल्या, की ‘मला एक गाणं आठवतं. हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके’ या ओळी म्हणत त्यांनी म्हटलं की अगोदर अशी घटना झाली आहे. आता हे कटकारस्थान उद्धव ठाकरेंसाठी केलं गेलं आहे. मात्र, मला शिंदे गटाची काळजी वाटते. म्हणूनच त्यांच्यासाठी हे गाणं आठवतं’ असं म्हणत त्यांनी टोला लगावला. या सगळ्या गोष्टींमुळे पक्ष मात्र संपत नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पण 2019 ला संपली असं काहीजण म्हणत होते. पण असे पक्ष संपत नसतात, असंही त्या म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. फडणवीस सगळंच बोलतात ते खरं नसतं. पक्ष बदलल्यावर असं बोललं जातं, राष्ट्रवादीवर आरोप केले जातात, असं त्या म्हणाल्या. Shivsena VS Shinde : शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा? त्या पुढे म्हणाल्या, की उपमुख्यमंत्री यांना विचारा मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत? मुंबई निवडणूक आता कमळावर लढली जाईल, असंही त्या म्हणाल्या. चंद्रकांत पाटील यांनी आई-वडील आणि मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की ‘माझ्यावर संस्कार झाले त्यात आई वडिलांना आदराचे स्थान आहे. माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलं नाही’. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही’, असं म्हटलं होतं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात