नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 09 ऑक्टोबर : शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर निवडणूक आयोगात धाव घेतली. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने जोरदार फिल्डिंग लावली. पण, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. धनुष्यबाण गोठवल्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील कमालीचे दुखावले आहे. दोन्हीही गटाची धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी होती मात्र चिन्ह नाही मिळालं याचं आम्हाला दुःख असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवास स्थानावरती बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वर्तवली आहे. ( ‘तर माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या..’; रवी राणांची एकनाथ शिंदेंना ऑफर ) शिवसेना संपली असा आम्ही कधी म्हणत नाही मात्र ताकदीच्या आधारावर पाहिलं तर दसरा मिळाव्यात कुणाची ताकद वाढली हे सिद्ध होत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. तसंच, बाळासाहेबांची शिवसेना संपायची असती तर आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो असतो. त्यामुळे कुणी काही म्हणत जरी असलं तरी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Shivsena VS Shinde : ‘धनुष्यबाण’ आधी शिवसेनेकडे नव्हते, असे मिळवले निवडणूक चिन्ह !) तसंच, निवडणूक आयोगाचा निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी नवीन चिन्हासाठी मात्र दोन्हीही पक्ष तयारीला लागले असल्याचे मतंही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.