पुणे, 29 ऑक्टोबर : पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी तर सुटत आणि पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. पाणीपुरीमध्ये शेवपुरी आणि दहीपुरी म्हणजेच एसपीडीपी हा प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र, पुण्यात एसपीडीपी हा प्रकार मोजक्याच ठिकाणी आपल्याला ख्यायला चांगला मिळतो. अशाच पैकी एक आहे पुण्यातील सुदामा भेळची एसपीडीपी होय. गेल्या 17 वर्षापासून सुदामा भेळने आपली एसपीडीपीची चव कायम राखली असून या चवीच्या जोरावर त्यांनी गेल्या 17 वर्षांमध्ये संपूर्ण
पुणे
शहरात 70 आउटलेट आता पर्यंत तयार केले असून अनेक पुणेकर खवय्यांचे जिभेची चोचले याद्वारे पुरवले जात आहेत. एसपीडीपी म्हणजे काय आपल्या सर्वांना पाणीपुरी माहितीच आहे. पाणीपुरीमध्ये शेवपुरी आणि दहीपुरी या दोघांचे बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे एसपीडीपी होय. सुदामा भेळची एसपीडीपी कॉलिटीमुळे ओळखले जात आहे. त्यांचे ताजे दही असू किंवा इतर सर्व पदार्थ हे अतिशय फ्रेश असतात. यामुळे यांची एसपीडीपी चवीसोबतच कॉलिटीला देखील चांगली असते. हेही वाचा :
Pune : झणझणीत मिसळीचा रंग तांबडा नाही तर हिरवा, पाहा VIDEO आम्ही दहा-बारा रुपयांमध्ये सुरुवातीला पाणीपुरी विकायचो. तिथून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली आहे. 200 रुपयांच्या भांडवला वरती आम्ही सुरुवात करून आतापर्यंत आम्ही 70 आउटलेट काढले आहेत. आमच्या सुदामा भेळमध्ये भेळी सोबतच चाटचे विविध प्रकार मिळतात आणि यामधली एसपीडीपी हा प्रकार सर्वत्र प्रसिद्ध असा आहे, असं सुदामा भेळचे ईश्वर पेर्ला सांगतात. अशी बनवतात एसपीडीपी एसपीडीपी म्हणजे दहीपुरी शेवपुरीमध्ये पाणीपुरीचा वापर केला जातो. त्यामध्ये कांदा बटाटा कुस्करून, पाणीपुरीची डाळ, गोड तिखट चटणी त्यावरती दही आणि शेव टाकून ही शेवपुरी आणि दहीपुरी तयार केली जाते. हेही वाचा :
हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना देखील सुदामा भेळची एसपीडीपी खाण्यासाठी लांबून यायचो आणि आता आमच्या लहान लहान मुलांना देखील आम्ही खाण्यासाठी आवर्जून आणतो. या ठिकाणीच एसपीडीपी खूप चांगली मिळती, असं येथील एका ग्राहकांने सांगितले. कुठे आहे सुदामा भेळ? सुदामा भेळ विमानतळ रोड समोर गोल्फ कोर्स, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र 411006
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.