Home /News /maharashtra /

पुण्याहून निघालेली ST बस सुसाट असताना चालकाला हार्टअटॅक; मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून 25 प्रवाशांना वाचवलं

पुण्याहून निघालेली ST बस सुसाट असताना चालकाला हार्टअटॅक; मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून 25 प्रवाशांना वाचवलं

स्वत:चा जीव धोक्यात असताना एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधानता राखल्यामुळे 25 प्रवाशांचे जीव वाचले आहेत.

    पुणे, 4 ऑगस्ट : पुणे-सातारा हायवेवर एक भयंकर घटना घडली आहे. स्वत:चा जीव धोक्यात असताना एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधानता राखल्यामुळे 25 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा हायवेवर एसटी बस सुसाट असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. बसला गती असतानाही त्याने कशीबशी बस बाजूला घेतली. चालकाने त्याच्यासोबत इतका मोठा प्रसंग घडला असतानाही प्रसंगावधान राखलं. बस थांबवल्यानंतर काही वेळातच चालकाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चालकाने दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केलं जात आहे. मात्र दुर्देवाने यात त्यांचा मृत्यू झाला. जालिंदर पवार असं 45 वर्षीय चालकाचं नाव आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर चालक जालिंदर पवार यांना चक्कर आली. यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळे बसमधील 25 प्रवाशांचे जीव वाचले. खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्यानंतर बसचा वेग मंदावला. वाहकाने चालकाला विचारणा केली, तेव्हा चक्कर येतं असल्याचं सांगत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. वाहकाने पवार यांना पुन्हा आवाज दिला, मात्र चालकानी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Heart Attack, Pune

    पुढील बातम्या