मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हृदयासाठी कसा ठरतो घातक? ही आहेत लक्षणे

काय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हृदयासाठी कसा ठरतो घातक? ही आहेत लक्षणे

तज्ज्ञांच्या मते ट्रिपल व्हेसल डिसीज हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा अतिशय धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 3 ऑगस्ट : हल्लीच्या काळात आपली जीवनशैली खूप बदललाय आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, अनियमित व्यायाम, पुरेशी झोप न घेणे यामुळे आपल्या शरीराला अनेक आजारांचा धोका वाढतो आहे. धावत्या काळात लोकांना हृदयाशी संबंधित आजार जास्त प्रमाणात जडत आहेत. हृदयविकारणद्दल तर सर्वांना माहीतच आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? हृदयविकारासारखाच जास्त गंभीर आणखी एक हृदयाशी संबंधित आजार आहे तो म्हणजे ट्रिपल व्हेसल डिसीज. जाणून घेऊया या आजाराबद्दल. काय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मानवाच्या संपूर्ण शरीराला हृदयाद्वारे रक्ताचा पुरवठा केला जातो. हृदयाकडे रक्त परत येणे धमन्यांद्वारे केले जाते. अनेक वेळा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्याने या धमन्यांमध्ये फॅट्स जमा होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तज्ज्ञांच्या मते हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा अतिशय धोकादायक प्रकार आहे. हृदयापर्यंत रक्त वाहून नेण्याचे काम 3 प्रमुख धमन्यांद्वारे केले जाते आणि जेव्हा या तीन धमन्या ब्लॉक होतात तेव्हा त्याला 'ट्रिपल व्हेसल डिसीज' असे म्हणतात. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ट्रिपल व्हेसल डिसीजची लक्षणे - छातीत दुखणे - धाप लागणे - थकवा येणे - गोंधळ उडणे - छातीत जळजळ किंवा गुदमरल्यासारखे वाटणे - मळमळ किंवा उलट्या होणे - शरीराच्या वरच्या भागात वेदना होणे. जसे की पाठ, जबडा, मान, हात किंवा खांदे दुखणे - चक्कर येणे किंवा हलके डोके दुखणे - जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका

Diet plan for diabetes : तुम्हाला डायबेटिस आहे का? तर मग असा डाएट प्लॅन नक्की फॉलो करा

ट्रिपल व्हेसल डिसीज पासून असा करा बचाव - तेलकट अन्न कमी करा. - निरोगी आहाराचे पालन करा - वजन वाढू देऊ नका - नियमित व्यायाम करा - रक्तदाब वाढू देऊ नका Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं? - दारू पिऊ नका - रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा - तणाव दूर करा
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Tips for heart attack

पुढील बातम्या