मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुणे पालिकेत अशी ही बनवाबनवी, नाट्यगृहातून 2 कोटींचे स्पिकर्स चोरले अन् बनावट बसवले

पुणे पालिकेत अशी ही बनवाबनवी, नाट्यगृहातून 2 कोटींचे स्पिकर्स चोरले अन् बनावट बसवले

 सुरक्षारक्षक असताना ही चोरट्यांनी सभागृहातील 12 स्पिकर्स चोरले आणि त्या स्पिकर्सच्या जागी बनावट स्पिकर्स बसविण्यात आले.

सुरक्षारक्षक असताना ही चोरट्यांनी सभागृहातील 12 स्पिकर्स चोरले आणि त्या स्पिकर्सच्या जागी बनावट स्पिकर्स बसविण्यात आले.

सुरक्षारक्षक असताना ही चोरट्यांनी सभागृहातील 12 स्पिकर्स चोरले आणि त्या स्पिकर्सच्या जागी बनावट स्पिकर्स बसविण्यात आले.

पुणे, 22 नोव्हेंबर : पुणे  महापालिकेत (pune municipal corporation) कोट्यवधी रुपयांचे स्पिकर्स चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहेत.  सभागृह सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने सभागृहात वेगवेगळे काम करण्यासाठी निधीची मागणी केली होती. मात्र जेव्हा प्रत्यक्षात दक्षता पथकाने पाहणी केली तेव्हा सुमारे 2 कोटी रुपयांचे स्पीकर्स चोरून नेण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या चोरीसाठी चोरांनी आधी सीसीटीव्ही फोडले होते.

पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहातील ( Annabhau Sathe Hall 2 Padmavati ) सुमारे 2 कोटी रुपयांचे 12 स्पिकर्स (Speakers) चोरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी चांगल्या दर्जाचे स्पिकर्स चोरून त्या जागी कमी दर्जाचे स्पिकर्स बसविले. हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला असतानाही महापालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे सर्वसाधारण सभेत उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू करण्यात आली आहे.  तशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली आहे.

पद्मावती येथे महापालिकेकडून काही वर्षांपूर्वी भव्य असे अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यात आले आहेत. महापालिकेने या ठिकाणी एका बड्या खासगी कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे 12 स्पिकर्स बसविण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये या सभागृहात कुठलेही कार्यक्रम करण्यात येत नव्हते. या काळात सुरक्षारक्षक असताना ही चोरट्यांनी सभागृहातील 12 स्पिकर्स चोरले आणि त्या स्पिकर्सच्या जागी बनावट स्पिकर्स बसविण्यात आले.

विधान परिषद निवडणुकीआधी अमरिश पटेल यांनी जिंकली 'ही' निवडणूक, भाजपचा झेंडा कायम

ऑक्टोबर महिन्यात हे सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात महापालिका प्रशासनाने सभागृहाची पाहणी केली. यावेळी 12 स्पिकर्स काढण्यात आले असून त्याठिकाणी बनावट स्पिकर्स बसविण्यात आल्याचे 22 ऑक्टोबर रोजी निदर्शनास आले. विद्युत विभागाकडून स्पिकर्सची चोरी झाल्याची माहिती सांस्कृतिक विभागाला पत्राद्वारे देण्यात आली होती. चोरट्यांनी या सभागृहात असलेल्या सीसीटीव्हीची तोडफोड केली होती. त्यामुळे तेथे असलेले सीसीटीव्ही कार्यरत राहिले नाहीत. परिणामी हा सर्व प्रकार कोणी केला, याची माहिती मिळू शकलेला नाही.

हा प्रकार घडला त्या काळात तेथे कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांची हजेरीपत्रक उपलब्ध नसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नगरसेवक सुभाष जगताप यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत हे स्पिकर्स चोरी गेले अजून त्याबाबत काय कारवाई झाली याची विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Afghanistan मध्ये महिलांची स्थिती दिवसेंदिवस वाईट, तालिबान्यांचा आता नवं फर्मान

दरम्यान, सांस्कृतिक विभागाने या प्रकरणी महापालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावल्या आहेत. संबंधित सेवकांनी अद्यापपर्यंत त्या नोटीशींना उत्तर दिलेले नाहीत. महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणाची माहिती घेण्यात आली असून लगेचच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असं सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष वारुळे यांनी स्पष्ट केलंय.

First published:
top videos

    Tags: Pune municipal corporation, Pune news