धुळे, 22 नोव्हेंबर : राज्यभरात जिल्हा बँकेच्या निवडणुका पार पडत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेत (Dhule and Nandurbar District Bank election) सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे. भाजपचे आमदार अमरीश पटेल (amrish patel) आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांच्या नेतृत्वावर बँकेच्या मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे.
खान्देशात जळगावनंतर धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. सुरुवातीला जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न देखील झाले. यात एकूण १७ पैकी सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत एकूण १७ पैकी १३ जागांवर भाजपचे प्राबल्य असलेल्या सर्वपक्षीय विकास पॅनलने बाजी मारली. सर्वपक्षीय शेतकरी विकास फायनलमध्ये अमरीश पटेल यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. यामध्ये माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे या पॅनलचे प्रमुख होते.
BREAKING : राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोले शरद पवारांच्या बंगल्याकडे रवाना
गेल्या १५ वर्षांपासून धुळे नंदुरबार सहकारी बँकेवरती आमदार अमरीश पटेल यांची निर्विवाद सत्ता राहिली आहे. आता पुन्हा नव्याने पटेल यांच्या गटाला सत्ता सूत्र सोपविण्यात आली असून, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे पुन्हा बँकेचे अध्यक्ष होतील असे संकेत आमदार अमरीश पटेल यांनी दिले आहेत.
कोर्टाची सूचना 'पुरावे तपासून आरोप करा', मलिक म्हणाले, 'लढा सुरूच राहणार'
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 17 पैकी 7 जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या. तर 10 जागांसाठी प्रत्यक्षात निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी आमंदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी पॅनलमध्ये काँग्रेस आमदार कुणाल पाटील, भाजप आमदार जयकुमार रावल, आदिवासी विकास मंत्री एड के. सी. पाडवी, शिरीष नाईक ही सर्व मंडळी सोबत होते. त्यामुळे निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच जिंकेल हे निश्चित मानलं जात होते. असं असलं तरी मतदार चमत्कार दाखवू शकतात अशी आशा असल्याने सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात लढणारे नंदूरबरचे शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी आमदार शरद पाटील यांना होती. मात्र, प्रत्यक्षात किसान संघर्ष पॅनलला केवळ चार जागांवर विजय प्राप्त करता आला.
भाजप खासदाराचे बंधू पराभूत
विशेष म्हणजे, भाजपचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांचा महाविकास आघाडीचे शरद पाटील यांनी पराभव केला. तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या अक्राणी मतदार संघातून शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सेनेच्या दोन सदस्यांना निवडून आणल्याने मंत्री पाडवींनाही हा जोरदार धक्का मानला जात आहे. एकीकडे सर्वपक्षीय पॅनेलचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असताना त्याच पॅनलमध्ये निवडणूक लढवणारे भाजप खासदारांचे भाऊ पराभूत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माजी आमदारांची दमदार कामगिरी
धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या या निवडणुकीत तीन माजी आमदार निवडून गेले आहेत. त्यात चंद्रकांत रघुवंशी, शरद पाटील आणि राजवर्धन कदमबांडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रघुवंशी आणि पाटील हे एकीकडे तक कदमबांडे हे स्वतंत्र पॅनलमधे उभे होते. तिन्ही माजी आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली होती.
राजवर्धन कदमबांडेच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ
या जिल्हा बँकेमध्ये गेल्या १५ वर्षापासून आमदार अमरीश पाटील आणि राजवर्धन कदमबांडे यांची सत्ता आहे. कदमबांडे हे गेल्या पाच वर्षांपासून बँकेचा कारभार सांभाळत आहेत. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली, त्यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळाल्याने त्यांना पुन्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी दिली जाईल, असे संकेत अमरीश पटेल यांनी दिलेले आहेत.
नवनिर्वाचित संचालक मंडळ २०२१
सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल =१३
१) राजवर्धन कदमबांडे २) दिपक पाटील (बिनविरोध) ३) भरत माळी (बिनविरोध) ४) शिरीष नाईक (बिनविरोध) ५) शीलाताई विजय पाटील (निवड) ६) सिमा तुषार रंधे (निवड) ७) प्रभाकरराव चव्हाण (बिनविरोध) ८) राजेंद्र देसले ९) हर्षवर्धन दहिते (निवड)१०) मंहत दर्यावगीर (निवड) ११) शामकांत सनेर (बिनविरोध) १२) भगवान पाटील (बिनविरोध) १३) अमरसिंग गावीत (निवड)
किसान संघर्ष चॅनल- ४
१) चंद्रकांत रघुवंशी २) शरद पाटील ३) आमशा पाडवी ४) संदिप वळवी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.