पुणे 24 जुलै : पुण्यातील मृत्यूंजय सावरकर प्रोग्राममध्ये प्रमुख वक्ते म्हणून शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सावरकरांना विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका केली. सावरकर समजत नाहीत म्हणून त्यांना विरोध केला जातो. सावरकर यांचा अपमान देशात झाला तेवढा कोणीच केला नसेल. सावरकर नावाची दहशत किती आहे हे काँग्रेसला माहिती आहे, असं पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले. शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी आमदारासह अनेक नगरसेवक आज शिंदेत गटात सामील होणार पुढे ते म्हणाले, की रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात. ही मुलं बघा अन् दिल्लीतला पण मुलगा बघा. या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही. गोळवलकर तर फारच लांबचा विषय आहे, असं म्हणत पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. पुढे ते म्हणाले, की सावरकर कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे. माझे खूप जवळचे स्नेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. सावरकर प्रेमींचा प्रॉब्लेम आहे की कोणी विरोधात बोलला तरी त्याला उत्तर देण्याची ताकद अन शद्ब आपल्याकडे नसतात. उत्तर देणारे कमी अन् आक्षेप घेणारे जास्त आहेत. हे जाणीवपूर्वक करतात, याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आमदार, खासदारांनी सोडली साथ; शिवसेना वाचवण्यासाठी आता नगरसेवक सरसावले, काय आहे प्लॅन? सावरकर याचं मोठेपण मान्य करणे म्हणजे राजकीय तोटा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही. सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे, यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती काँग्रेसला पण आहे अन् ती दहशत आणखी वाढली पाहिजे, असं पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.