पुणे,07 ऑगस्ट : पोपट वारंवार शिट्ट्या मारतो आणि त्याचा त्रास आम्हाला होतो. म्हणून पोपटाच्या मालकाला शिवीगाळ केल्याने पुण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PUNE POLICE) अकबर अमजद खान या तरुणावर खडकी पोलीस स्थानकात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात राहणारे अकबर अमजद खान यांनी एक पोपट पाळला आहे. हा पोपट वारंवार सुरेश शिंदे यांना बघून शिट्या मारत होता. चिडलेल्या शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट माझी झोपमोड करतो, मला त्याचा शिट्टीचा त्रास होतो. तुम्ही त्याला दुसरीकडे ठेवा म्हणून शिवीगाळ केली. यावरून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवतीवर रॉट व्हीलर कुत्रा अंगावर धावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील शिवाजी हौसिंग सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या एका युवतीने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवती आपण अंडी खरेदी करण्यासाठी बाहेर आलो असता हा प्रकार घडला असल्याचं सागितले आहे.
हे ही वाचा : ‘आजचा छावा, उद्याचा वाघ’ तेजस ठाकरेंच्या नावाने लागले होर्डिंग!
रॉटव्हीलर कुत्रा हा त्या मालकाने फिरवण्यासाठी आणला होता मात्र त्यांच्या गळ्यात पट्टा नसल्याने तो कुत्रा युवतीच्या अंगावर आला, यावेळी कुत्रा मालकाला या युवतीने विचारले तेव्हा मालकाने तिला शिव्या दिल्या. याप्रकरणी अज्ञात कुत्रा मालका विरोधात चतुरशुर्गी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणी पोलीस या अज्ञात कुत्रा मालकाचा शोध घेत आहेत.
कुत्रा पाळण्याचे नियम माहिती आहेत का तुम्हाला?
एनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी पाळीव कुत्र्यासाठी काही नियम बनवले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे, जर कोणी घरमालक कुत्रा पाळत असेल आणि महानगरपालिकेचे कोणत्याही नियमाचे उल्लंघन न करता, शेजारच्यांना त्रास न देता. कुत्रा घरात ठेवत असेल तर तो कुत्रा पाळू शक भारतीय संविधान आर्टिकल A(G) नुसार प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की तो प्राण्यांबद्दल दया, प्रेम दाखवू शकतो. त्याचबरोबर अधिनियम 1960 11 (3) नुसार हाऊसिंग सोसायटीत पाळीव प्राण्यांना पाळण्याचा अधिकार आहे. याशिवाय भाडेकरूदेखील घरात कुत्रा पाळू शकतो.
हे ही वाचा : शिंदे गटात गोलमाल है भाई गोलमाल है, केसरकरांच्या प्रवक्ते पदावरून उदय सामंतांचे ट्वीस्टवाले ट्वीट
शेजारीचे कसे करू शकता तक्रार ?
खूप लोकांची समस्या असते की कुत्रा खूप जास्त भुंकत असेल ज्याने शेजारच्यांना त्रास होत असेल अशावेळी के करावे? यासाठी समोरच्या व्यक्तीला समज दिली जाते. जर तुम्हाला कोर्टात तक्रार करायची असेल तर ध्वनी प्रदूषण होत आहे म्हणून तक्रार करू शकतात. त्यात आवाज, घाणेरडा वास या तक्रारीचा समावेश असतो.