मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आजचा छावा, उद्याचा वाघ' तेजस ठाकरेंच्या नावाने लागले होर्डिंग!

'आजचा छावा, उद्याचा वाघ' तेजस ठाकरेंच्या नावाने लागले होर्डिंग!

तेजस ठाकरेंची राजकारणातील सक्रिय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग लागले आहे.

तेजस ठाकरेंची राजकारणातील सक्रिय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग लागले आहे.

तेजस ठाकरेंची राजकारणातील सक्रिय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग लागले आहे.

मुंबई, 07 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आता राजकारणात एंट्री करणार अशी चर्चा रंगली आहे. अशातच आजचा छावा उद्याचा वाघ, असे उल्लेख असलेले होर्डिंग मुंबईत लागले आहे. तेजस ठाकरेंची राजकारणातील सक्रिय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग लागले आहे. तेजस ठाकरे यांच्या आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर वरळीत लागले आहे. शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांनी हे होर्डिंग लावले आहे. विशेष म्हणजे, वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या होर्डिंगची चर्चा रंगली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे या राजकीय लढाईमध्ये त्यांचं शेवटचं अस्त्र बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंचे दुसरे पूत्र तेजस ठाकरे  राजकारणात एण्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच, शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर तेजस ठाकरे कोल्हापूरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले, यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेतलं. तेजस ठाकरे राजकारणात आले तर नवल वाटायला नको, असं शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. (थेट दुसऱ्या राज्यात पोहोचले 5 अल्पवयीन मुलं-मुली; कारण ऐकून पोलीसही चक्रावले) तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात आतापर्यंत फारसे दिसले नाहीत. 2019 साली अहमदनगरमध्ये तेजस ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीदरम्यान तेजस ठाकरेही उपस्थित होते. वन्यजीव संशोधनामध्ये तेजस ठाकरे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात एंट्री करणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या