मुंबई, 07 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील 40 आमदारांना घेत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला. दरम्यान मागचा दिड महिना उलटला तरी अजुनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे शिंदे गटाकडून केसरकरांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याच्या चर्चा होत्या यावर बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी खुलासा करून शिंदे गटातीलच नेत्यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे.
भाजप नेते निलेश राणे आणि दिपक केसरकर यांच्या सिंधुदुर्गमध्ये तुतुमैमै सुरू आहे. केसरकर यांनी टीका केल्यावर नितेश राणे हे ही जहरी टीका करत असल्याने हा वाद राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याने शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांचे प्रवक्ते पद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली. यावर उदय सामंत यांनी खुलासा केला, ते म्हणाले कि, मा. दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत.. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : निलेश राणेंनी केसरकरांना दिली ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर, शिंदे गट-भाजपमध्ये वाद चिघळला
दरम्यान अद्यापही मंत्रीमंडळ विस्ताराचा पत्ता नाही अन् शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमंध्ये आतापासूनच खडाजंगी पहायला मिळत असल्याने पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असेच म्हणावे लागेल. या सगळ्या घडामोडींमुळे गोलमाल है भाई गोलमाल है अशा मिम्सही सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्ली वाऱ्या करत असल्याने मंत्रीमंडळ विस्तार लवकर होईल अशी आशा सर्वांना वाटू लागली आहे.
राणे- केसरकर वाद चिघळला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. नारायण राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. त्याबद्दल आपण त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असं विधान केसरकरांनी केलं होतं. पण, यावरून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले. आता निलेश राणे यांनी थेट केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे.
हे ही वाचा : कधीतरी यावरही बोला, ईडीच्या कोठडीतून राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
‘दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे’ असं म्हणत निलेश राणेंनी एकेरी उल्लेख करत केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे.