मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आषाढी एकादशीदिवशी पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचा निर्णय मागे

आषाढी एकादशीदिवशी पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचा निर्णय मागे

जलसाठ्यात पाणीपातळी वाढल्याने पाणीकपातीचा (Pune water Crises) निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता सुरळित होणार आहे

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 10 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणेकरांना आषाढी एकादशीची खुशखबर मिळाली आहे. खडकवासला साखळी धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पुणेकरांना आता दररोज पाणी मिळणार आहे.

VIDEO : पंढरपुरात रावसाहेब दानवे झाले 'चहावाले', दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

जलसाठ्यात पाणीपातळी वाढल्याने पाणीकपातीचा (Pune water Crises) निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता सुरळित होणार आहे. सध्याच्या जलसाठ्यानुसार 26 जुलैपर्यंत पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे. 26 जुलैनंतर पाणी वाटपाचा पुन्हा फेरआढावा घेण्यात येईल.

गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा 2.5 टीएमसीवर गेला होता. यानंतर राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) सतर्क केले आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, पीएमसीने 4 जुलैपासून शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाआड केला होता. मात्र आता पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे.

सावधान! कोकणातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, पुढचे दोन दिवस अतिमहत्वाचे

याआधी सणासुदीच्या दिवसांचा हवाला देत 11 जुलैपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत केला होता. यानंतर आता 26 जुलैपर्यंत पुणेकरांना दररोज पाणी मिळणार आहे.

First published:

Tags: Drink water, Pune news, Water crisis