जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : पंढरपुरात रावसाहेब दानवे झाले 'चहावाले', दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

VIDEO : पंढरपुरात रावसाहेब दानवे झाले 'चहावाले', दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

VIDEO : पंढरपुरात रावसाहेब दानवे झाले 'चहावाले', दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पंढरपुरात वारकऱ्यांसाठी स्वत: चहा बनवला तसंच त्यांची विचारपूस केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंढरपूर, 10 जुलै (विजय कमळे पाटील) : आषाढी एकादशीनिमित्तानं (Ashadhi Ekadadshi) लाखो वारकरी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान यापैकी कशाचीही पर्वा न करता विठूरायाच्या भेटीसाठी हे वारकरी पंढरपुरात मोठ्या भक्तीभावानं दाखल झाले आहेत. ‘याचसाठी केला होता अट्टहास… शेवटचा दिस गोड व्हावा’ अशी या वारकऱ्यांची एकदाशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेताना भावना असते. यंदा कोरोनाच्या विघ्नानंतर 2 वर्षांच्या ब्रेकनंतर वारी पार पडली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्यत विशेष उत्साह होता. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक जण झटत असतात. पंढरपूर तालुक्यातील शिरसगाव मंडप येथिल सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरमध्ये लागले आहे. वारीमधील प्रत्येक प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाचं छोटं हॉटेल लावतात. त्यांच्या हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना वाटला. आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांना भेट घेत त्यांची विचारपूस केली.

जाहिरात

मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची महापूजा; पाहा Photos ‘हा पाऊस असाच कायम राहून सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ देत तसेच राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ दे’ ही मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.यानंतर झालेल्या मंदिर समितीच्या कार्यक्रमातदेखील ते सहभागी झाले. यावेळी पंढरपूर शहराचा तिरुपतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात