मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान! कोकणातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, पुढचे दोन दिवस अतिमहत्वाचे

सावधान! कोकणातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, पुढचे दोन दिवस अतिमहत्वाचे

हवामान खात्याकडून (Maharashtra imd alert) राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा (Maharashtra Konkan area heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून (Maharashtra imd alert) राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा (Maharashtra Konkan area heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून (Maharashtra imd alert) राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा (Maharashtra Konkan area heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.

  मुंबई, 10 जुलै : हवामान खात्याकडून (Maharashtra imd alert) राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा (Maharashtra Konkan area heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार (Konkan area all district heavy rainfall red alert) ते अति मुसळधार (64 ते 200 मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे. याचबरोबर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66 मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा पातळीपेक्षा खाली  वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक तैनात करण्यात आली आहेत.

  हे ही वाचा : गडचिरोली : चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक; तिघांचे मृतदेह सापडले

  ठाणे जिल्ह्यात मागच्या 24 तासात सरासरी 76.4 मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

  मुंबई गेल्या 24 तासात कुलाबा येथे 52.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 49.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफ च्या एकूण 5 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 77.9 मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील 1968 कुटुंब म्हणजे एकूण 3649 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 11 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 

  हे ही वाचा : ' ....तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती' संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

  रत्नागिरी जिल्ह्यात 71.5 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता (09 जुलै) बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 127.7 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एनडीआरएफ ची टीम तैनात करण्यात आली आहेत, पुणे विभागात  पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Konkan, Monsoon, Rainfall, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या