मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Coronavirus : मुंबईपाठोपाठ पुणे कोरोनाच्या विळख्यात! रोजची संख्या 200 वर गेली तरी पुणेकर अनभिज्ञ?

Coronavirus : मुंबईपाठोपाठ पुणे कोरोनाच्या विळख्यात! रोजची संख्या 200 वर गेली तरी पुणेकर अनभिज्ञ?

मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाची चौथी लाट हळूहळू डोकं वर काढू लागलीय. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाचा दैनंदिन आकडा हा 200 च्या वर पोहोचला आहे.

मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाची चौथी लाट हळूहळू डोकं वर काढू लागलीय. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाचा दैनंदिन आकडा हा 200 च्या वर पोहोचला आहे.

मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाची चौथी लाट हळूहळू डोकं वर काढू लागलीय. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाचा दैनंदिन आकडा हा 200 च्या वर पोहोचला आहे.

पुणे, 17 जून : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) विस्फोट पाहायला मिळत होता. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाचा दैनंदिन आकडा हा 200 च्या वर पोहोचला आहे. मात्र, पुणेकरांना त्याच गांभीर्य नसल्याचे (Pune Corona Update) शहरातील वातावरणावरुन दिसून येत आहे. राज्य सरकार अजूनतरी कोरोनाची चौथी लाट नसल्याचे सांगत आहे. मात्र, वाढती आकडेवारी पाहता पुन्हा एकदा यावर विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणेकर अनभिज्ञ

पुण्यातील कोरोना हातपाय पसरायला लागला आहे. मात्र, आम्ही पुणे शहरातील काही भागात फिरल्यानंतर लक्षात आलं की नागरिक यापासून अजून अनभिज्ञच आहेत. पुणे स्टेशन येथील वर्दळीच्या भागात कुणीही मास्क वापरताना दिसत नाही किंवा प्रशासनाकडून लोकांना मास्कबाबत हटकत असल्याचेही चित्र नाही. कारण पुणेकरांना वाटतं कोरोना जणू संपला आहे. पण, प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. अवघ्या आठवड्यातच कोरोनाचा आकडा सव्वादोनशेवर तर सक्रीय रूग्णसंख्या 1 हजाराच्यावर जाऊन पोहोचली आहे. खाली दिलेली ही आकडेवारी पाहा.

रूग्णसंख्या (पुणे मनपा)

11 जून 130

12 जून 106

13 जून 73

14 जून 137

15 जून 172

16 जून 193

17 जून 214

आरोग्य अधिकाऱ्यांचा पुणेकरांना आवाहन

दरम्यान, वाढती कोरोना आकडेवारी बघून आरोग्यविभाग सज्ज झाला आहे. रूग्णांना वेळीच ओळखण्यासाठी टेस्टिंग वाढवल्याचं पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे सांगतात. पुणेकरांनी पहिल्या तीन कोरोना लाटांमध्ये खूप काही गमावलंय म्हणूनच चौथी लाट सुरू होण्याआधीच थोपायची असेल तर पुणेकरांनी किमान गर्दीच्या ठिकाणी तर आत्तापासूनच मास्क वापरायला सुरू करावे, असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.

नवीन व्हेरियंटचा पुण्यात शिरकाव

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचे 10 रूग्ण पुण्यात आढळून आले आहेत. पण, त्यामुळे या नुकतेच डोकं वर काढू पाहणाऱ्या कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आत्तापासूनच सज्ज राहावं लागणार आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus cases, Covid-19, Pune