जाहिरात
मराठी बातम्या / देश / Covid-19 Updates In India: देशातल्या Positivity Rate नं वाढवली चिंता, चार महिन्यांनंतर इतक्या टक्क्यानं वाढ

Covid-19 Updates In India: देशातल्या Positivity Rate नं वाढवली चिंता, चार महिन्यांनंतर इतक्या टक्क्यानं वाढ

Covid-19 Updates In India: देशातल्या Positivity Rate नं वाढवली चिंता, चार महिन्यांनंतर  इतक्या टक्क्यानं वाढ

Covid-19 Positivity Rate: कोरोना साथीच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी सर्व राज्यांनी यावर गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून: India Covid-19 Cases: कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा मंदावलेला वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भारतात चार महिन्यांनंतर, कोविड-19 संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला. कोरोना साथीच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी सर्व राज्यांनी यावर गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे आवाहन केलं आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी (Corona Infection) केलेल्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहनही केले आहे. देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. बुधवारी, गेल्या 24 तासांत संसर्गाची 8822 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या तीन महिन्यांतील एका दिवसात नोंदवलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. ताज्या प्रकरणांनंतर, देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53, 637 झाली आहे. त्याच वेळी दैनिक संसर्ग दर 2.35 टक्के नोंदवला गेला. गेल्या 24 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला बुधवारी जाहीर झालेल्या कोरोना संसर्गाच्या अहवालानुसार, 24 तासांत संसर्गामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता देशात कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या 5,24,792 झाली आहे. मात्र देशात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या दरानं पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोनाचा वेग मंदावला होता. पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. जन्मदाती आईचं झाली वैरी, पोटच्या मुलीला तब्बल 20 वेळा चाकूनं भोसकलं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या प्रकरणांवर आरोग्य मंत्रालय सातत्यानं लक्ष ठेवून आहे. या साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आरोग्य विभागाकडूनही लोकांना सातत्याने कोरोनाविरोधी लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात