Home /News /maharashtra /

हे पुण्यातच होऊ शकतं! इथे मुलांना मिळणार वाहतूक नियमांचं 'बाळकडू'; PMC च्या अनोख्या पाठशाळेचा VIDEO

हे पुण्यातच होऊ शकतं! इथे मुलांना मिळणार वाहतूक नियमांचं 'बाळकडू'; PMC च्या अनोख्या पाठशाळेचा VIDEO

title=

पुण्यातील वाहतुकीची समस्या जगजाहीर आहे. त्यामुळे मुलांना लहानपणीच वाहतुकीच्या नियमांची सवय व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध परिसरात 'ट्रॅफिक पार्क' (Traffic Park) उभारला आहे.

  पुणे, 7 जून : मुलांना काही गोष्टी लहानपणीच शिकवल्या तर त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. त्या गोष्टींचं ते पालन करतात. त्यामध्ये चांगल्या सवयी नेहमीच भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या असतात. हाच विचार करून पुणे महापालिकाने लहान वयातच मुलांना वाहतुकीचे नियम लक्षात राहावेत, यासाठी औंध परिसरात 'वाहतूक पाठशाला उद्यान' अर्थातच ट्रॅफिक पार्क (Traffic park) उभं केलं आहे. वाहतुकीच्या नियमांचे धडे मुलांना लहानपणी मिळावेत, या उद्देशाने ही अनोखी बाग उभी केलेली आहे. (Traffic park for children's in pune city) पुण्यातील वाहतुकीची समस्या ही मोठी प्रशासनासमोर मोठी डोकेदुखी आहे. बहुतेक जण नियम पाळतच नाहीत. त्यामुळेच वाहतुकीच्या पाठशाळेत लहान मुलांना त्यांच्या वयानुसारच वाहतुकीचे धडे मिळावेत आणि यातून भविष्यामध्ये सुजाण आणि नियमांचे पालन करणारे नागरिक घडावे, या उद्देशाने ही वाहतुकीची पाठशाळा ही संकल्पना राबवली गेली. येणाऱ्या भावी पिढीला रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना कोणकोणत्या नियमावलीच पालन करावं, यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून मुलांची वाहतूक पाठशाळा उद्यान सुरू करण्यात आलं आहे. कोणत्या संकल्पनेवर हे उद्यान आकारला आलं? आपल्या इथं वयाच्या 18 व्या वर्षानंतर वाहतुकीचे वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. मात्र, वाहतुकीचे नियम आणि त्याचे प्रशिक्षण फारच कमी वेळा आपल्याला मिळते. याबाबतची जनजागृती लहानपणापासूनच निर्माण व्हावी त्यांना वाहतुकीचे नियम आणि धडे मिळावे. तसेच रस्त्यावर अपघात होतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि अपंगत्व येते. या बाबींचा विचार करून अर्बन 95 संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प वाहतूक विषयक उभारण्याचे ठरवण्यात आले.पुण्यात कुठं आहे हे उद्यानं? औंध येथील ब्रेमन चौक, सिंधू सोसायटी येथे सुमारे एकरभर जागेत हे उद्यान उभारलं आहे. या उद्यानामध्ये 12 वर्षांखालील मुलांना प्रवेश आहे. येथे वाहतुकीच्या सर्व नियमांचे फलक लावण्यात आले आहेतच, त्याचबरोबर रस्त्यांवरील मार्गिका, सायकल मार्ग, सिग्नल यंत्रणा, रस्त्यांवरचे चौक, पार्किंगची व्यवस्था या गोष्टींची प्रात्यक्षिक मुलांना मिळावी, याचीदेखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळेच मुलांकडून लहान वाहनांसोबत खेळता खेळताच वाहतुकीच्या नियमांचीदेखील धडे गिरविले जातात.

  गुगल मॅपवरून साभार...

  काय आहे उद्यानाचा उद्देश? भारतात मुलांचे वय १८ झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाणा मिळतो. शालेय जीवनामध्येही याबाबतची हवी तशी माहिती दिली जात नाही. याचा परिमाण म्हणजे वाहतूक नियम पालन करण्याकडे नागरिकांचे आणि तरुणांचे दुर्लक्ष होते, त्यातून छोटे-मोठे अपघात होतात. मुलांना शहरातील वाहतूक व्यवस्था कशी आहे आणि त्याचे नियम काय हे सांगण्यासाठी हे उद्यान सुरू करण्यात आले आहे. तिकीट दर किती आणि कसे पोहोचाल या पार्कमध्ये? या ट्रॅफिक पार्कचे तिकीट मनपा शाळेच्या मुलांना 5 रुपये आहे. इतर विद्यार्थ्यांना 20 रुपये तिकीट आहे. पार्कची वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असून सोमवार ते शुक्रवार हे पाच सुरू दिवस सुरू असते. शनिवार आणि रविवार सुट्टी असते. पुणे शिवाजीनगर स्टेशन येथून 13 किलोमीटर अंतरावर हे पार्क असून औंधला जाणाऱ्या बसने या ठिकाणी जाता येते.
  First published:

  Tags: Pune news, Pune police

  पुढील बातम्या