पुणे, 10 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हरिएंटने (Omicron variant of Coronavirus) जगभरात चिंता वाढली, त्याच दरम्यान ओमायक्रॉनने महाराष्ट्रात शिरकाव केला आणि एकच खळबळ उडाली. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील ओमायक्रॉन बाधित रुग्ण कोरोनामुक्त (Dombivli omicron affected man tests negative) झाल्यानंतर आता पुण्यातीलही एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच या बातमीमुळे पुणेकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा दिलासा मिळाला आहे. (Big relief as Pune omicron infected patient tests negative for covid 19)
हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलँड येथे गेला होता. त्यानंतर तो पुण्यात परतला होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणं नसल्यामुळे तो संस्थात्मक क्वॉरनटाईनमध्ये होता. 10 दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून पुढील 7 दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
वाचा : Omicron चा धोका असतानाच नाशकात कोरोनाचा उद्रेक, 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
पुण्यात डीपीडीसीच्या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी अजित पवारांनी सांगितले, ओमायक्रॉन बद्दल आपण रोज ऐकतोय, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ओमायक्रॉन रूग्ण सुस्थितीत आहेत, पुण्यातील पहिला रूग्ण तर आजच कोरोनामुक्त झाला आहे. संपर्कातील 6 पैकी 4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तरीही संपर्कात आलेल्याचं ट्रेसिंग सुरू आहे.
लसीकरणाचा वेग वाढवला
मागील दहा दिवसात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. दुसऱ्या डोसबाबत लोक पहिले टाळाटाळ करायचे पण ओमायक्रॉन आल्यापासून प्रशासनाने पुन्हा लसीकरणचा वेग वाढवला आहे. पुणे जिल्ह्यातील मृत्यूदर आटोक्यात आहे. दुसऱ्या डोससाठी लोकांनी पुढे यावं असं आवाहन ही अजित पवारांनी केलं आहे.
वाचा : फक्त या एका गोष्टीमुळेच Omicron सारख्या कोरोनाचा धोकाही 225 पटींनी कमी होतो; तज्ज्ञांचा दावा
राज्यातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाबाबत दिलासादायक माहिती
राज्यात पहिला ओमायक्रॉन (Omicron Positive) पॉझिटिव्ह आलेल्या डोंबिवलीतील (Dombivali ) रुग्णाला अखेर (8 डिसेंबर रोजी) डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच ही संपूर्ण देशासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कल्याणच्या कोव्हीड रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
त्या दरम्यान त्याचा ओमायक्रॉन अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान दोन आठवड्यात दोन वेळा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली होती. अखेर आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या रुग्णाला आता 7 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
परदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या कोविड रिपोर्टमध्ये आढळला हा Corona variant
झांबिया देशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचा जनुकीय तपासणीचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. त्या तपासणीत तो रुग्ण ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असून, त्याला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेजवळील झांबिया देशातून काही दिवसांपूर्वी हा व्यक्ती पुण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune