Home /News /coronavirus-latest-news /

Omicron : राज्यातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाबाबत दिलासादायक माहिती

Omicron : राज्यातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाबाबत दिलासादायक माहिती

ही संपूर्ण देशासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

कल्याण, 8 डिसेंबर : राज्यात पहिला ओमायक्रॉन (Omicron Positive) पॉझिटिव्ह आलेल्या डोंबिवलीतील (Dombivali ) रुग्णाला अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच ही संपूर्ण देशासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कल्याणच्या कोव्हीड रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या दरम्यान त्याचा ओमायक्रॉन अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान दोन आठवड्यात दोन वेळा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली होती. अखेर आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या रुग्णाला आता 7 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून 24 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आलेल्या 32 वर्षीय रुग्णाचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. राज्यातील हा पहिला रुग्ण असल्याने काळजी वाढली होती. दरम्यान 27 तारखेपासून हा रुग्ण केडीएमसीच्या कल्याण येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत होता. त्याला कोणतीही लक्षण नव्हती. त्याची प्रकृती स्थिर होती. त्याची पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने या रुग्णाला बुधवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. हा देशातील पहिला रुग्ण डिस्चार्ज झाला आहे. विशेष म्हणजे आज या रुग्णाचा वाढदिवस आहे. आणि त्याच दिवशी त्याने कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. नायजेरियामधून आलेल्या त्या चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे, असे देखील आयुक्तांनी सांगितले. दक्षिण आफ्रिका केपटाऊनहून हा रुग्ण दुबई, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन 24 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत दाखल झाला होता.  त्याला ताप आल्याने त्याने स्वत: जाऊन डॉक्टरकडे तपासणी केली. टेस्ट केली असता त्याची कोरोना टस्ट पॉझिटीव्ह आली होती. महापालिकेने त्याची गंभीर दखल घेत 27 नोव्हेंबर रोजी त्याला महापालिकेच्या आर्ट गॅलरीतील कोविड रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले. त्याचे नमुने जीनोम सिक्वेसिंगकरीता एनआयव्हीला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट 4 डिसेंबरला पॉझिटीव्ह आला होता. राज्यातील हा पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण होता. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह राज्याची धास्ती वाढली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या  सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. या रुग्णाला कोणतेही लक्षणे आढळून आली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर होती. रिपार्ट आल्यानंतर त्याची महापालिकेने पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याचा रिपार्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र असले तरी त्याला आणखीन सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. हे ही वाचा-मोठा दिलासा! Omicron वर औषध सापडलं; GSK-Vir च्या शास्त्रज्ञांनी दिली Good news योगायोग म्हणजे या रुग्णाचा आज वाढदिवस असल्याचे आयुक्त म्हणाले. त्याची आयुक्तांनी फोनवरुन विचारपूस करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही बाब महापालिकेसह देशासाठी समाधानकारक आणि दिलासा देणारी असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona, Corona patient

पुढील बातम्या