Home /News /maharashtra /

Pune : 'पुणे मेट्रोनं केला डीपी रस्ता गायब! प्रशासनातील एकालाही पत्ता नाही'

Pune : 'पुणे मेट्रोनं केला डीपी रस्ता गायब! प्रशासनातील एकालाही पत्ता नाही'

पुणे शहरात सध्या मेट्रो रेल्वेच्या (Pune Metro Rail) कामांनी चांगलीच गती घेतली आहे. मेट्रो रेल्वेचं काम शहरामध्ये सुरू असतानाच या कामावर गंभीर आरोप होत आहे.

  पुणे, 5 ऑगस्ट : पुणे शहरात सध्या मेट्रो रेल्वेच्या (Pune Metro Rail) कामांनी चांगलीच गती घेतली आहे. मेट्रो रेल्वेचं काम शहरामध्ये सुरू असतानाच या कामावर आरोप देखील होत आहेत. पुण्यातील मेट्रो रेल्वे विभागानं थेट डीपी रस्ता (DP Road) गायब केला आहे. या प्रकरणाचा पत्ता आयुक्त, बांधकाम विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, स्थानिक भाजपा नगरसेवक आणि आमदार यांना याचा कोणताही पत्ता नाही,' असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. काय आहे प्रकरण? आम आदमी पक्षाच्या शंकर थोरात यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणात आपण जून महिन्यापासून  महानगरपालिका, मेट्रो आणि शेतकी महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार केल्याचा त्यांचा दावा आहे. शिवाजीनगर वाकडेवाडी येथे साखर संकुल , जवळून हा रस्ता नियोजित आहे. हा रस्ता वाकडेवाडी येथून रेल्वे मार्गाला समांतर खडकी येथपर्यंत व तेथून सिंचन विभागाकडे प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे मेट्रो प्रवासी, रेल्वे प्रवासी व स्थानिक रहदारी ही जुन्या महामार्गावर न जाता या समांतर रस्त्याने होईल. मेट्रो रेल कॉर्पोरेशननं थेट या रस्त्यावर अतिक्रमण करीत येथे रूळ टाकून ही जागा ताब्यात घेतल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. 'या रस्त्यामुळे रेल्वे आणि मेट्रोसाठी सर्विस रोड स्वरूपाचा या रस्त्याचा उपयोग होणार होता. आता हा रस्ताच बंद झाल्याने पुढील काळात वाहतुकीवर परिणाम होऊन कोंडी होणार आहे. याबाबत आपण मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक गाडगीळ यांना याची पूर्ण माहिती यापूर्वीच दिली आहे.' असे थोरात यांनी स्पष्ट केले.
  पुणे मेट्रोनं डीपी रोड गायब केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे.
  गाडगीळ यांनी याबाबत अनेक दिवस चालढकल केली त्यामुळे आपचे शंकर थोरात , शिवाजीनगर चे अध्यक्ष सतीश यादव आणि आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून याबाबत तातडीने पाऊले उचलण्याबाबत निवेदन दिले आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मालमत्ता विभागाने ही जागा ताब्यात घेण्याची आवश्यकता असताना प्रशासन व मेट्रो अधिकारी गाडगीळ , मेट्रो साईट डेपो इन्चार्ज ब्रिजेश भट्टाचार्य हेही तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. मात्र आम आदमी पार्टी याबाबत गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. सतत चुकणारे ओव्हर ब्रिज , चुकलेले अंडर पास आणि आता गायब डीपी रस्ता ही सर्व स्मार्ट सिटीतील अंदाधुंद कारभाराच्या खुणा आहेत, असा आरोप थोरात यांनी केले आहेत. Yog Yogeshwar Jay Shankar : घरबसल्या घ्या शंकर महाराजांच्या मठाचं दर्शन, VIDEO 'प्रसिद्धीसाठी आरोप' पुणे महापालिकेत सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत.'विकासकामांना अडथळा कसा आणता येईल आणि ते वादात कसे सापडतील, असा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीनंतर आता आम आदमी पक्ष देखील करत आहे. पुणे मेट्रोचा प्रकल्प हा नियोजनबद्ध आणि अभ्यास करुन पुढे नेण्यात आलेला आहे. आता घरबसल्या काढा Learning Driving License, Video पाहा आणि कामाला लागा! ज्या डीपी रस्त्याच्या बाबतीतच 'आप' मुद्दे उपस्थित करत आहे, त्या रस्त्याबाबत अजून कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. याबाबत महापालिका प्रशासन नक्कीच योग्य निर्णय घेईल.-आता मात्र मेट्रोच्या कामात अडथळा आणून किंवा वाद निर्माण करुन आप ला नेमकं काय साध्य करायचंय? मेट्रोला आमचे प्राधान्य आहे आणि ते राहीलंही… कारण मेट्रो हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असणार आहे.महापालिका निवडणूकीच्या तोंडावर केवळ प्रसिद्धीच केलेला हा आरोप आहे,' असं उत्तर मुळीक यांनी दिलं आहे.
  First published:

  Tags: AAP, Pune, Pune metro

  पुढील बातम्या