Home /News /maharashtra /

आता घरबसल्या काढा Learning Driving License, Video पाहा आणि कामाला लागा!

आता घरबसल्या काढा Learning Driving License, Video पाहा आणि कामाला लागा!

title=

गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाकडं ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) असणे अनिवार्य आहे. हे लायसन्स घरबसल्या काढण्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    पुणे, 4 ऑगस्ट : गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाकडं ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) असणे अनिवार्य आहे.  मात्र आजकाल फार कमी वयात गाडी मिळाल्यामुळे बऱ्याच तरुण मुला- मुलींकडे लायसन्स नसते. आरटीओ ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे हे किचकट काम आहे. त्यामुळे बरेच जण ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा कंटाळा करतात. आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून सहज तुम्ही लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्ही अर्ज करू शकता. चला तर मग लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कसा अर्ज करायचा जाणून घेऊया. कसे काढणार लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स? लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी यासाठी प्रथम Parivahan.gov.in या संकेतस्थळावर जावे. यानंतर Online Services मध्ये जाऊन Sarathi Services हा पर्याय निवडायचे आहे. यामध्ये तुम्हाला Apply NEW LEARNER'S LICENSE या पर्यायावर क्लिक करून \"Continue\" म्हणायचे आहे. Applicant does not have any Driving Lience/Learner Licence issued in India हा पर्याय निवडून Via Adhar Authentication क्लिक करायचे आहे. OK करून आपला आधार कार्ड वरील नंबर रिकाम्या जागी भरावा. त्यानंतर आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट करायचा. यापुढे Accept Declaration सबमिट करावा. Dy. RTO निवडुन आधार कार्डशी सलग्न सर्व माहिती यामध्ये लिंक आधार कार्ड मधून भरली जाते. त्यापुढे Class of Vehicle या पर्यायद्वारे आपल्याला कोणत्या वाहनाचे लर्निंग लायसन्स हवे आहे. हा पर्याय निवडावा यातून एप्लीकेशन नंबर जनरेट होतो. ॲप्लिकेशन नंबर जनरेटर झाल्यानंतर आपल्याला वीस केबीपर्यंतची आपली सही अपलोड करायचे आहे. त्यानंतर लर्निंग लायसनची 150 रुपये फी देखील ऑनलाईन भरायची आहे. लर्निंग लायसन्सची फी भरल्यानंतर तुम्हाला 20 मिनिटांचा रोड सेफ्टी व्हिडिओ पाहणे अनिवार्य आहे. हा व्हिडिओ पाहून झाल्यावरती 15 मार्काची आपली एक परीक्षा होते. या परीक्षेतील 9 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यावर तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळते. कालसर्प योग म्हणजे काय? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय पर्मनंट लायसन्स कसं काढणार? लर्निंग लायसन्स काढून झाल्यानंतर एका महिन्यानंतर तुम्ही पर्मनंट लायसन्स काढू शकता. या लर्निंग लायसन्सची मुदत सहा महिन्यापर्यंत असते. पर्मनंट लायसन्स काढल्यानंतर देखील अशाच प्रकारे पुन्हा एकदा ॲप्लिकेशन भरून लायसन्स साठी आपण अर्ज करू शकता. याद्वारे आपल्या जवळील आरटीओ ऑफिसमध्ये आपल्याला वाहन चालवण्याच्या परीक्षेची स्लॉट बुक करू शकता.
    First published:

    Tags: Driving license, Pune

    पुढील बातम्या