Home /News /maharashtra /

Yog Yogeshwar Jay Shankar : घरबसल्या घ्या शंकर महाराजांच्या मठाचं दर्शन, VIDEO

Yog Yogeshwar Jay Shankar : घरबसल्या घ्या शंकर महाराजांच्या मठाचं दर्शन, VIDEO

title=

पुणे शहरामध्ये धनकवडी परिसरामध्ये श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांचा समाधी मठ आहे.

  पुणे,05 ऑगस्ट : सध्या कलर्स मराठीवर योग योगेश्वर जय शंकर (Yog Yogeshwar Jay Shankar) ही मालिका सुरू आहे. या मालिकेनं शंकर महाराजांच्या भक्तांमध्ये विशेष स्थान मिळवलं आहेच. त्याचबरोबर सामान्य प्रेक्षकांमध्येही मालिका लोकप्रिय झाली आहे. शंकर महाराज कोण होते? त्यांचा पुण्यातील मठ कसा आहे? या मठाची खासियत काय? याची अनेकांना मोठी उत्सुकता आहे. याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुणे शहरामध्ये धनकवडी परिसरामध्ये श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांचा समाधी मठ आहे. या मठाला दररोज हजारो भाविक भेट देत असतात. याठिकाणी श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांनी 1947 साली समाधी घेतली होती. या मठाला अनेक भाविक, राजकीय व्यक्ती आणि बॉलिवूड कलाकार भेट देत असतात. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, धीरूभाई अंबानी अशा अनेक सुप्रसिद्ध कर्तृत्ववान व्यक्तींनी आतापर्यंत महाराजांच्या समाधी मठाला भेट देऊन दर्शन घेतले आहे.

  हेही वाचा- Osmanabad : उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

  गुरुवारी 30 ते 40 हजार लोक मठाला देतात भेट  श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज मठ हे अतिशय जागृत देवस्थान असून येथे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी तमाम भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटीच येथे दर गुरुवारी 30 ते 40 हजार लोक मठाला भेट देऊन दर्शन घेतात. तसेच प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला येथे महाराजांची पालखी निघते. कारण की 1947 साली अष्टमीच्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली होती. महाराजांचा सहवास लाभलेले काही लोक अजूनही महाराजांबद्दलच्या आख्यायिका सांगतात. त्यांना महाराजांचे  आलेले अनुभव देखील ते विशद करत असतात. महाराजांच्या असंख्य लीला असून यावरती ग्रंथ देखील लिहिले गेलेले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर यांनी दिली आहे.  गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव  नवनाथ संप्रदायाचे श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज आहेत. गुरुपरंपरेमधील महत्त्वाचे गुरु म्हणून देखील शंकर महाराज प्रसिद्ध आहेत. संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक गुरुपौर्णिमेला तसेच अष्टमीला येत असतात. तसेच महाराजांच्या समाधी अमृत महोत्सव निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला रक्तदान शिबिराचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात येते. मंदिरामध्ये दररोज खिचडीचा प्रसाद भाविकांना दिला जातो. तसेच महाराजांच्या समाधी वरती फुले, पेढे अर्पण केले जातात.

  हेही वाचा- Aurangabad : संसार सावरला इतरांनाही आधार दिला; महिलेची जिद्द वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान VIDEO

  या वेळी देऊ शकतात मठाला भेट  मठाची वेळ पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत असते.  श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज गाभारा भाविकांसाठी पहाटे 4:30 ते दुपारी 1 व दुपारी 3:30 ते रात्री 10:30 अशी असते. श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज अभिषेक व नित्य पूजा सकाळी 5.45 पर्यंत संपन्न होते. गुरुवार, दुर्गाष्टमी व सणाचे दिवशी गाभारा दुपारी पूर्ण वेळ उघडा असतो. गाभारा व सभामंडप दुपारी 1 ते 3.30 दरम्यान बंद असतो तसेच दुर्गाष्टमी व इतर मोठे सणा दिवशी गाभारा दर्शनासाठी खुला असतो. तसेच मठामध्ये त्रिकाळ आरती होते सकाळी 7 दुपारी 12 आणि सायंकाळी 6 :30 वाजता होत असते. कसे पोहोचाल मठात? FVC5+42V, शंकर महाराज मठ, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे, महाराष्ट्र 411043 हा मठाचा पत्ता आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर 159 किलोमीटर अंतर  आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर 243 किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेसदेखील इथंपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास ते देखील या मठापर्यंत पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात.
  First published:

  Tags: Pune

  पुढील बातम्या