मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक, भीषण अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी

Pune: आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक, भीषण अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू, 20 जखमी

Pune accident news: आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक-अप गाडी शिरली.

Pune accident news: आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक-अप गाडी शिरली.

Pune accident news: आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक-अप गाडी शिरली.

  • Published by:  Sunil Desale

गणेश दुडम, प्रतिनिधी

पुणे, 27 नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात (Major accident after Pick up vehicle enter in Warkari Dindi) झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 20 वारकरी जखमी झाले आहेत. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी पिक अप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Major accident to Warkari Dindi in Pune district)

ही दिंडी खालापूर येथून आलंदीकडे जात होती त्यावेळी हा अपघात झाला. कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उपचारादरम्यान मृत झालेल्या वारकऱ्यांची नावे

1) सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड

2) जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड

जुना पुणे मुंबई महामार्गावर कार्तिकी एकादशीला आळंदीकडे खालापूरच्या उंबर गावातील वारकऱ्यांच्या पायी दिंडीला कान्हे फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडी सोहळ्यात पिकअप गाडी घुसल्याने दिंडीतील सुमारे 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले असून, दोन जणांचा मृत्य झाला आहे.

वाचा : पिंपरीत पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचं गूढ उकललं, हल्ल्यामागचं नेमकं कारण आलं समोर

सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड आणि जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड अशी मयतांची नावे उंबरे,ता.खालापूर, जि. रायगड येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील हे वारकरी होते. मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेला वारकरी मार्गस्थ होत असताना कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी पायी दिंडीच्या मधोमध घुसली. त्यामुळे दिंडीत एकच कल्लोळ झाला, तर जखमी रस्त्यावर विव्हळत होते. या अपघातात दिंडीत सुमारे 200 वारकरी असल्याची माहिती वडगांव मावळ पोलिसांनी दिली.

पुणे-सोलापूर महामार्गावर एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले

पुणे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. अज्ञात वाहन पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूर दिशेने चालले होते. याच दरम्यान महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसली. या अज्ञात वाहनाने 5 जणांचा चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. घुबरा तीलकराम गौतम (वय 35), मुकेश तीलकराम (वय 10) रिंकी तीलकराम गौतम (वय 7) अशी मृतांची नाव आहे.

First published:

Tags: Accident, Pune, Warkari