मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुणे-सोलापूर महामार्गावर एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले, आईसह 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले, आईसह 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 26 नोव्हेंबर : पुणे-सोलापूर महामार्गावर ( Pune-Solapur highway) भीषण अपघात घडला आहे.  पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. अज्ञात वाहन पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूर दिशेने चालले होते. याच दरम्यान महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसली. या अज्ञात वाहनाने 5 जणांचा चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. घुबरा तीलकराम गौतम (वय ३५), मुकेश तीलकराम (वय १०) रिंकी तीलकराम गौतम (वय ७) अशी मृतांची नाव आहे.

आई सोडून गेली पण 10 महिन्याचे बाळ दूध पिण्यासाठी धडपडत होतं, अमरावतीतील घटना

तीलकराम गौतम, सागर गौतम (वय 8) अशी जखमींची नाव आहे. या दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात, एक जागीच ठार

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्याजवळ एका लक्झरी बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रिपल सीट असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबई दिशेने जाणाऱ्या लेनवर विरार फाट्याजवळ दुचाकी ट्रिपल सीट असलेल्या वाहकाला सोडण्यासाठी थांबली होती.

इतक्यात रस्ता क्रॉस करताना गाडीवरून उतरलेल्या वाहकाला भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिली.  लक्झरी चालक पळून जायच्या तयारीत होता मात्र गाडीचा वेगावर नियंत्रण नसल्याने बस दुचाकीला धडकली. या विचित्र अपघातात भाताने गावातील प्रकाश मोरे (४०) या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लक्झरी चालकाला ताब्यात घेतले असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First published: