Home /News /maharashtra /

Pune: पुण्यात देशी गोवंश पशू प्रदर्शन; विद्यार्थीनीचे गुण ऐकून अजित पवारांनी अक्षरश: जोडले हात, पाहा VIDEO

Pune: पुण्यात देशी गोवंश पशू प्रदर्शन; विद्यार्थीनीचे गुण ऐकून अजित पवारांनी अक्षरश: जोडले हात, पाहा VIDEO

पुणे : विद्यार्थीनीचे गुण ऐकून अजित पवारांनी अक्षरश: जोडले हात, पाहा VIDEO

पुणे : विद्यार्थीनीचे गुण ऐकून अजित पवारांनी अक्षरश: जोडले हात, पाहा VIDEO

Pune News: पुण्यात आज देशी गोवंश पशू प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थीनीचे मार्क्स ऐकून चक्क तिच्यासमोर हात जोडले.

पुणे, 27 मे : देशी गोवंश पशू प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आलं. 27 मे ते 29 मे दरम्यान हे प्रदर्शन सुरू असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थीनीने मिळवलेले गुण ऐकूण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्यासमोर अक्षरश: हात जोडले. नेमकं काय घडलं? प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या वस्तू, पदार्थांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यार्थ्यांकडून घेत होते. या वस्तू, पदार्थांची किंमत किती? कशा प्रकारे निर्मिती करण्यात आली? तूपाची क्वालिटी कशी असते? या संदर्भात माहिती घेतली. त्यावेळी विद्यार्थीनीला अजित पवारांनी विचारले, तुम्ही राहता कुठे? यावर विद्यार्थीनीने सांगितले मी टेंभूर्नी, सोलापूर. तुम्हाला मेरिटवर अॅडमिशन मिळालं का? किती टक्के मिळाले? त्यानंतर त्या विद्यार्थीनीने म्हटलं, हो मेरिटवर मिळालं. 99.10 % हे ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसत हात जोडले आणि म्हटलं, 99 पॉईंट आणि... . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसत हात जोडल्याने उपस्थितांमध्येही हशा पिकला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, इथल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहून डोळेच पांढरे झाले, आमचे दोन वर्षांचे मिळून ही एवढे मार्क झाले नसते. पण कौतुक आहे तुमचं असंही अजित पवारांनी म्हटलं. वाचा : राज्यसभा निवडणुकीतून माघार? थोड्याच वेळात संभाजीराजेंची पत्रकार परिषद LIVE अजित पवार पुढे म्हणाले, राजकारणात असलो तरी आधी मी शेतकरी आहे. बंगळुरूला जाऊन आम्ही संक्रीत गायी आणलेल्या. देशी गायीच्या दूध, तूप, खवा, गोमूत्रला अनन्य साधारण महत्त्व आहे. तंत्रशुद्ध शेतीकडे वळण्याकडे प्राधान्य, बारामतीला भेट देऊन शेती प्रयोगाची माहिती घ्या. शेतकरी आपल्या गोवंश बद्दल हळवा, हा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे. राज्य सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करतोच आहे. गोवंश आर्थिक विकासाच साधन ठराव, काही काही जण यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. या प्रदर्शनात थारपारकर, गीर, सहिवाल, लाल सिंधी, राठी या भारतीय दुधाळ गोवंश पाहता येणार आहे. तसेच पशू व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन, दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांची माहिती प्रदर्शनात देण्यात येणार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Pune

पुढील बातम्या