Home /News /mumbai /

Sambhaji Raje: राज्यसभा निवडणुकीतून माघार? थोड्याच वेळात संभाजीराजेंची पत्रकार परिषद LIVE

Sambhaji Raje: राज्यसभा निवडणुकीतून माघार? थोड्याच वेळात संभाजीराजेंची पत्रकार परिषद LIVE

Sambhaji Raje: राज्यसभा निवडणुकीच्या सहान्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं. मात्र, या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला असून भाजपही आपला उमेदवार देणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता संभाजीराजे काय भूमिका घेतात हे पहावं लागेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 मे : राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी संभाजीराजेंनी पत्रही लिहिलं. मात्र, सहाव्या जागेवर शिवसेनेने (Shiv Sena) आपला उमेदवार दिला आहे. तर भाजप सुद्धा आपला उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता संभाजीराजे काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संभाजीराजे हे निवडणूक लढणार की अर्ज दाखल न करताच माघार घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संभाजीराजे या संदर्भात आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संभाजीराजे मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे काय घोषणा करतात हे पहावं लागेल. माघार घेण्याची शक्यता संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. त्यानंतर संभाजीराजे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ऑफर देण्यात आली. मात्र, यावर संभाजीराजेंची कुठलीही प्रतिक्रिाय न आल्याने अखेर शिवसेनेने सहाव्या जागेवर संजय पवार यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने आपला उमेदवार दिल्याने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळणं संभाजीराजेंसाठी कठीण झालं आहे. तसेच विजयी होण्याइतकी मते भाजपकडे नाहीयेत आणि भाजपची आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर अर्ज दाखल करण्यासाठी 10 आमदारांचे अनुमोदन आवश्यक असते आणि ते सुद्धा संभाजीराजेंना मिळवता आले नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता संभाजीराजे हे निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वीच माघार घेण्याची शक्यता आहे. वाचा : महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, "महाराज.... तुमच्या नजरेतलं स्वराज्य...." काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज काल (26 मे) दाखल केला. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी स्तव: आणि कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. मी खात्रीने सांगू शकतो की, या वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे 31 मे रोजी ते अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवारही लवकरच आपला अर्ज दाखल करेल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. भाजपने तीन, चार उमेदवार देवो... आम्ही आमच्या जागा निवडून आणणार. त्यांनी ईडी, सीबीआयचा दबाव टाकून जर वाटत असेल की जागा जिंकू तर त्यांनी प्रयत्न करत रहावे. आम्हाला पूर्ण अधिकार आहे आमच्या जागा लढण्याचा... शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Rajyasabha, Sambhajiraje chhatrapati, Shiv sena

    पुढील बातम्या