Home /News /maharashtra /

Pune murder: लग्नानंतरच्या फोन कॉल्सने घेतला कारागृह अधीक्षकांच्या मुलाचा जीव, धक्कादायक माहिती उघड

Pune murder: लग्नानंतरच्या फोन कॉल्सने घेतला कारागृह अधीक्षकांच्या मुलाचा जीव, धक्कादायक माहिती उघड

Pune News: अमरावतीला कारागृह पोलीस अधीक्षक असलेल्या गायकवाड यांच्या मुलाची हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरला चाकूने वार करून हत्या करण्यात आली.

पुणे, 26 मे : हडपसर (Hadapsar) मध्ये पती, पत्नी और वो या सिनेमा सारख्याच कथानकातून साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीने पोलीस अधीक्षकांच्या मुलाची हत्या (Amravati Jailer son murder) केली आहे. आरोपी साक्षी हिने आपला पती आणि भावाच्या मदतीने अमरावतीला कारागृह पोलीस अधीक्षक असलेल्या गायकवाड यांच्या मुलाची हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर येथे चाकूने वार करून हत्या केली. पुण्यातील हडपसर येथे पती पत्नी और वो सिनेमातल्या कथानकाप्रमाने खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कथानकातल्या मुलीने म्हणजे साक्षी पांचाळ आणि तिच्या पतीने भावाच्या मदतीने घडवून आणला आहे. हडपसर पोलिसांनी साक्षी पांचाळ हिच्यासह तिचा पती आणि भाऊ यांच्यासह इतर तीन जणांना अटक केली आहे. गिरीधर गायकवाड (वय 21 वर्षे) असे मयत तरुणाच नाव आहे. या मयत तरुणाच्या मोबाइलवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला. तिला भेटून येतो असं सांगून घरातून गेल्यावर बराच वेळ तो परतला नाही. त्यानंतर अगदी काही मिनिटांनी अमरावतीला जेलर असलेल्या वडीलांचा घरी फोन आला. ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे त्यांनी सांगितले. वाचा : पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या मृत गिरीधर गायकवाड आणि साक्षी पांचाळ हे एकाच कॉलेजमधे शिकतात आणि एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. साक्षी पांचाळचा प्रेमविवाह झालेला असुनही ती गेल्या काही महिन्यांपासून माहेरी रहात होती. तिचा नवरा काल तिला भेटायला आला असता त्याला साक्षी पांचाळच्या मोबाईलमधे गिरीधर गायकवाडचे फोन रेकॉर्ड दिसले. त्यानंतर साक्षी पांचाळच्या पतीने तिला गिरीधर गायकवाडला फोन करुन बोलावून घ्यायला सांगितले. साक्षी पांचाळने गिरीधर गायकवाडला हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत बोलावून घेतले. यावेळेस साक्षी पांचाळ तिचा नवरा, नवर्‍याचे दोन मित्र आणि साक्षीचा भाऊ असे पाचजण हजर होते. त्यावेळी गिरीधर गायकवाडवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गिरीधर गायकवाड याचा जागेवरच मृत्यू झाला. गिरिधर याची हत्या करण्यासाठीच पती आणि भावाने साक्षीला गिरिधर याला फोन करून गोड बोलून बोलवून घ्यायला सांगितलं आणि त्याची हत्या केली. या घटनेनंतर पती, पत्नी और वो या सिनेमाच्या कथानाकाप्रमानेच घटना घडल्याची चर्चा दिवसभर हडपसरमध्ये होती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Pune

पुढील बातम्या