Home /News /maharashtra /

Pune Crime : पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या, तरुणीने खून केल्याचं उघड

Pune Crime : पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या, तरुणीने खून केल्याचं उघड

पुण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही.

पुणे, 25 मे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Police Officer son Murder) करण्यात आली आहे. या हत्येमागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या हत्येच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्याचा मुलाची जर अशाप्रकारे हत्या होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न काही स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. पण संबंधित हत्येमागे नेमकं कारण काय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिसांना तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली आहे. एका तरुणीने चार जणांच्या मदतीने तरुणाची हत्या केल्याचं पोलीस तपासात निषपन्न झालं आहे. या हत्येमागे नेमकं कारण काय होतं? याचा तपास आता पोलीस करत आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत असलेलेले उद्रेश्वर गायकवाड यांच्या मुलाची पुण्यात काल रात्री निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचा मुलगा अवघा 21 वर्षांचा होता. गिरीधर उद्रेश्वर गायकवाड असं त्याचं नाव होतं. त्याच्या हत्येच्या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गिरीधरची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता गायकवाड कुटुंबाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका तरुणीने ही हत्या घडवून आणल्याचीदेखील प्राथमिक माहिती समोर येत आहे. गिरीधरचे त्या तरुणीसोबत काय संबंध होते? दोघांचे भांडण झाले होते का? झालं असेल तर त्यांच्यात इतक्या टोकाचं भांडण का झालं असेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. (चोरी करणाऱ्या चोराची घराबाहेर निघताना झाली पंचाईत, कुत्र्यांनी घेरल्याने गेटवरच लटकला आणि...) घटना नेमकी कशी घडली? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक गिरीधर हा मंगळवारी रात्री आपल्या पुण्यातील घरी होता. त्याला रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका तरुणीचा फोन आला. त्या फोननंतर तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर त्या तरुणीने इतर पाच सहकाऱ्यांसोबत त्याची निर्घृण हत्या केली. आपला मुलगा घराबाहेर पडून बराच वेळ झाला तरी घरी आला नाही म्हणून गायकवाड कुटुंबाने शोधाशोध सुरु केली. या दरम्यान गिरीधरचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. खून प्रकरणी अनोळखी पाच जणांविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक तरुणाच्या मोबाईलवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला. तिला भेटून येतो अस सांगून घरातून गेल्यावर बराच वेळ तो परतला नाही. त्यानंतर अगदी काही मिनिटांनी अमरावतीला जेलर असलेल्या वडिलांच्या घरी फोन आला. ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे सांगितले. तिथे पोलीस गेल्यावर गिरीधर याचा मृतदेह असल्याची ओळख पटली. तर त्याचवेळी तिथे असलेले एक प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चार पुरुष आणि एक तरुणी यांनी गिरीधर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या