मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /PKL 2022 : फजल अत्राचली कसं करणार पुणेरी पलटणचं स्वप्न पूर्ण? पाहा Video

PKL 2022 : फजल अत्राचली कसं करणार पुणेरी पलटणचं स्वप्न पूर्ण? पाहा Video

X
यापूर्वी

यापूर्वी यु मुंबाचा कॅप्टन असलेल्या फजलकडं यंदा पुणेरी पलटणची जबाबदारी आहे. फजल पुण्याची विजेतेपदाची प्रतीक्षा संपवणार का?

यापूर्वी यु मुंबाचा कॅप्टन असलेल्या फजलकडं यंदा पुणेरी पलटणची जबाबदारी आहे. फजल पुण्याची विजेतेपदाची प्रतीक्षा संपवणार का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

    पुणे, 8 नोव्हेंबर : इराणचा फजल अत्रचाली हा प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सर्वात यशस्वी विदेशी खेळाडू आहे. आशियाई स्पर्धेत भारताला पराभूत करणाऱ्या इराणच्या टीमचा फजल कॅप्टन होता. पीकेएल स्पर्धेतही त्यानं स्वत:ला सिद्ध केलंय. तो या लीगच्या इतिहासात सर्वाधिक टॅकल पॉईंट्स घेणारा विदेशी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचा अनुभव आणि पीकेएलमधील त्याची कामगिरी यामुळे तो भारतातही चांगलाच लोकप्रिय आहे. यापूर्वी यु मुंबाचा कॅप्टन असलेल्या फजलकडं यंदा पुणेरी पलटणची जबाबदारी आहे. फजल पुण्याची विजेतेपदाची प्रतीक्षा संपवणार का? याकडे पुण्याच्या फॅन्सचं लक्ष लागलंय.

    कसा घडला फजल?

    इराणचा साधा कबड्डीपटू ते पीकेएलमधील सुपरस्टार असा प्रवास फजलनं केला आहे. या प्रवासाबद्दल फजलनं न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली. फजल यावेळी म्हणाला की, 'कबड्डीपूर्वी मी दुसरे खेळ खेळत असे. पण, मी कबड्डी हा खेळ पाहिला तेव्हा मला हा खेळ खूप आवडला. एशियन गेम्सनंतर माझी पीकेएलसाठी निवड झाली. इथं निवड होणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी इथं खेळतोय त्याचा मला आनंद आहे.'

    पुणेरी पलटणच्या अपेक्षांचं ओझं फजलच्या खांद्यावर आहे. याची त्याला जाणीव आहे. पीकेएल स्पर्धा ही चांगलीच मोठी आहे. त्यामध्ये खेळाडूंच्या कौशल्याचा आणि टीमच्या खेळाचा कस लागतो हे देखील अनुभवी फजलला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आमची टीम एकावेळी एकाच मॅचचा विचार करते असं फजलनं सांगितलं.

    PKL 2022 : महाराष्ट्राचा श्रीकांत जाधव कसा बनला बंगालचा वॉरियर! पाहा Video

    'आमच्यासाठी प्रत्येक मॅच वेगळी आहे. त्या मॅचची योजना वेगळी आहे. आम्ही आधी समोरच्या टीमचा अभ्यास करतो. त्या टीमची कमकुवत बाजू कोणती हे पाहतो आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. आमची टीम चांगली आहे. आमच्याकडे चांगले रेडर आणि डिफेन्डर आहेत. मी आत्ताच आमची रणनीती सांगणार नाही, ती तुम्हाला मॅचमध्ये दिसेल,' असे त्याने यावेळी स्पष्ट केले.

    पलटणची जोरदार सुरूवात

    पुणेरी पलटणनं प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सिझनची सुरूवात जोरदार केली आहे. पहिल्या 11 मॅचनंतर पुण्याची कबड्डी टीम 6 विजय, 3 पराभव आणि 2 बरोबरीसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 38 पॉईंट्सची कमाई केलीय. पुणेरी पलटणकडून आत्तापर्यंत अस्लम इनामदार हा यशस्वी रेडर ठरला असून फजल अत्रचाली हा सर्वोत्तम डिफेंडर ठरला आहे.

    First published:

    Tags: Local18, Pro kabaddi, Pro kabaddi league, Pune, Sports