पुणे, 5 नोव्हेंबर : मराठमोळ्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, इराण, जपान, थायलंड, दक्षिण कोरिया या आशियाई देशांमध्येही आता कबड्डी हा खेळ लोकप्रिय झाला आहे. कबड्डी खेळाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देण्याचं काम प्रो कबड्डीनं (PKL) केलं आहे. पीकेएलचा नववा सिझन सध्या सुरू आहे. माजी विजेत्या बंगाल वॉरियर्सची या सिझनमधील भिस्त ही मराठमोठा कबड्डीपटू श्रीकांत जाधववर आहे. पीकेएलमधील पुणे लीग सध्या सुरूय. त्या निमित्तानं श्रीकांतनं आमच्या प्रतिनिधिशी बोलताना त्याचा आजवरचा प्रवास उलगडला आहे.
कबड्डीनं दिले आर्थिक स्थैर्य
श्रीकांत यावेळी बोलताना म्हणाला की, ' कबड्डी हा खेळ सर्वत्र प्रसिद्ध होत तशी कबड्डीपटूंची देखील प्रगती होत गेली. टीव्हीवर झळकावं ही प्रत्येकाची इच्छा असते. या खेळामुळे आम्ही प्रसिद्ध झालो. घरातील सर्वांना आमचा अभिमान वाटतो. कबड्डीनं आम्हाला नवीन ओळख मिळवून दिली. आर्थिक स्थैर्य मिळाले.'
गावात मातीत खेळला जाणारा हा पारंपारिक खेळ आता मॅटवरती खेळला जातोय. त्यांनंतरही आमची मातीशी असलेली बांधिलकी कायम आहे, असे श्रीकांतने यावेळी स्पष्ट केले.
मराठी श्रीकांत बंगालचा वॉरियर!
महाराष्ट्राचा श्रीकांत या सिझनमध्ये बंगाल वॉरियर्सकडून खेळतोय. बंगालला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. बंगालच्या टीममध्ये निरनिराळी भाषा बोलणारे खेळाडू आहेत. त्याबद्दल श्रीकांतनं त्याचा अनुभव सांगितला,' कबड्डीमध्ये आम्हाला कधीही भाषेची अडचण जाणवत नाही. कारण की यातील नियम सर्वत्र सारखे आहे आणि आम्हा सर्वांची आवड म्हणजे कबड्डी ही एकच असल्यामुळे कबड्डी खेळामध्ये विविध राज्यातून देशातून येणाऱ्या खेळाडूंची एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे जमते. आणि एकमेकांच्या संगमनतानेच आम्ही हा खेळ खेळतो. हा एक टीम गेम असल्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखता एकमेकांच्या प्लस, मायनस बाजू माहीती आहेत. त्यामुळे खेळाची रणनीती आखणे सोपे जाते.
Virat Kohli: भारतीय ड्रेसिंग रुममधल्या 'या' खास व्यक्तीसोबत विराटनं कापला केक
सध्या जी मुले कबड्डी खेळ खेळत आहे. त्यांनी खेळावर व्यवस्थित फोकस करून योग्य डाएट आणि खेळाच्या विविध पैलूंना आत्मसात केले तर त्यांना भविष्यामध्ये कबड्डी या खेळामध्ये खूप चांगले करिअर करता येऊ शकेल.
या कबड्डी खेळामध्ये मुलींनी देखील सहभाग वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा खेळ सांघिक असल्यामुळे इथे एकमेकांच्या मदतीनेच आपल्याला प्रगती करता येते,' असे मत श्रीकांतने यावेळी व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports