मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amarnath Cloudburst : आळंदीचे 50 भाविक ढगफुटीत अडकले, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Amarnath Cloudburst : आळंदीचे 50 भाविक ढगफुटीत अडकले, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, आळंदीतील अजय सोनुने महाराज आळंदी परिसरातील 50  भाविकांना घेऊन अमरनाथला गेले होते. शुक्रवारी दर्शन करून परत येत असताना अचानक ढगफुटी झाली

पुणे 09 जुलै : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत (Amarnath cloudburst) आतापर्यंत 16 जणांचा (16 Died in Amarnath Cloudburst) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार, तब्बल 40 जणं बेपत्ता आहेत. या दुर्घटनेवेळी आळंदी येथील काही भाविकही तिथे होते. यात आळंदी येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे.

अमरनाथ ढगफुटीत बेपत्ता भाविकांचा धक्कादायक आकडा; आतापर्यंत 13 ते 15 जणांचा दुर्देवी मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, आळंदीतील अजय सोनुने महाराज आळंदी परिसरातील 50 भाविकांना घेऊन अमरनाथला गेले होते. शुक्रवारी दर्शन करून परत येत असताना अचानक ढगफुटी झाली. यात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित सगळे भाविक सुखरूप असून बेस कॅम्पकडे परतत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. इतर पर्यटक संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.

जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा गुहेजवळच तब्बल 10 ते 15 हजार भाविक हजर असल्याचं सांगितलं जात आहे. ढगफुटीचं वृत्त कळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं. मात्र दुर्देवाने तोपर्यंत मोठ्या संख्येने भाविक वाहून गेले होते.ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले 25 टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले. पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी जमा झालं आहे.

अमरनाथमध्ये ढगफुटी, देवाच्या दारात मोठं संकट, यात्रेला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

बीएसएफ काश्मीर मुख्यालयातून मृतदेह श्रीनगरमधील पोलीस मुख्यालयात नेले जात आहेत. घटनास्थळावरून आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. 40 जण अजूनही बेपत्ता असून 64 जण जखमी असल्याचं समोर येत आहे.

First published:

Tags: Jammu kashmir