मराठी बातम्या /बातम्या /देश /अमरनाथ ढगफुटीत बेपत्ता भाविकांचा धक्कादायक आकडा; आतापर्यंत 13 ते 15 जणांचा दुर्देवी मृत्यू 

अमरनाथ ढगफुटीत बेपत्ता भाविकांचा धक्कादायक आकडा; आतापर्यंत 13 ते 15 जणांचा दुर्देवी मृत्यू 

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक तेथे हजर होते.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक तेथे हजर होते.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक तेथे हजर होते.

श्रीनगर, 8 जुलै : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत (Amarnath cloudburst) आतापर्यंत 13 ते 15 जणांचा (Army says 13 dead and 48 missing) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार, तब्बल 48 जणं बेपत्ता आहेत. जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा गुहेजवळच तब्बल 10 ते 15 हजार भाविक हजर असल्याचं सांगितलं जात आहे.

ढगफुटीचं वृत्त कळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं. मात्र दुर्देवाने तोपर्यंत मोठ्या संख्येने भाविक वाहून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 13 जणांवर आर्मीच्या MI रुममध्ये उपचार सुरू आहेत. तर 25 जणांवर SASB रुग्णालयात उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे भाविकांना एअर लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र ते शक्य झालं नाही. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून भाविकांचा शोध सुरू आहे.

पवित्र अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्राथमिक सूचनेनुसार ढगफुटीनंतर पाणी वाढल्यामुळे अनेक भाविक यात अडकले आहेत. भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव दल पोहोचले आहेत. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओदेखील समोर आले आहे.

ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले 25 टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले. पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी जमा झालं आहे.

First published:

Tags: Jammu and kashmir